केंद्र सरकारने डिजिटल लाईफ सर्टिफिकेट अभियान 4.0 ला सुरुवात करून देशभरातील लाखो निवृत्तीधारकांना मोठा दिलासा दिला आहे. या उपक्रमामुळे पेन्शनर्सना(pensioners) आता जीवन प्रमाणपत्र सादर करण्यासाठी बँका किंवा सरकारी कार्यालयांच्या लांबलचक रांगांमध्ये उभे राहण्याची गरज उरली नाही. ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग आणि घराबाहेर जाणे कठीण असणाऱ्या पेन्शनर्ससाठी हे अभियान अत्यंत उपयुक्त ठरत आहे.सरकारने दिलेल्या माहितीनुसार, या सेवेद्वारे दोन कोटींहून अधिक पेन्शनर्सना डिजिटल सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. देशातील २,००० हून अधिक शहरांमध्ये आणि भागांमध्ये हे अभियान सुरू असून प्रत्येक पेन्शनरला घरबसल्या जीवन प्रमाणपत्र दाखल करण्याची मुभा मिळत आहे.

या सेवेसाठी पेन्शनर्सने जीवन प्रमाणपत्र अ‍ॅप डाउनलोड करून आधारद्वारे फिंगरप्रिंट किंवा फेस व्हेरिफिकेशन करावे लागते. प्रमाणपत्र सबमिट झाल्यानंतर पेन्शनर्सना (pensioners)प्रमाणपत्र आयडी आणि पीपीओ क्रमांकासह डाउनलोड लिंक देखील मिळते.या अभियानातील सर्वात मोठा दिलासा म्हणजे इंडिया पोस्ट पेमेंट्स बँक चे कर्मचारी आता पेन्शनर्सच्या घरी जाऊन जीवन प्रमाणपत्र नोंदवून देत आहेत. त्यामुळे घरातून बाहेर पडणे अवघड असणाऱ्या ज्येष्ठांना आणि दिव्यांगांना ही सेवा वरदान ठरत आहे.

दरम्यान, EPFO नेही डिजिटल लाईफ सर्टिफिकेट जमा करण्याची प्रक्रिया अधिक सुलभ केली आहे. सदस्यांना आता मोबाईलवरून फेस स्कॅन करून थेट जीवन प्रमाणपत्र सबमिट करता येत असल्याने पेन्शनर्ससाठी ही आणखी एक मोठी सुविधा उपलब्ध झाली आहे.या डिजिटल उपक्रमांमुळे निवृत्तीधारकांच्या आयुष्यातील मोठा त्रास कमी झाला असून डिजिटल भारत मोहिमेला आणखी गती मिळत आहे.

हेही वाचा :

टीम इंडियाच्या ‘लाला’सोबत खेळताना दिसणार सचिन तेंडुलकरचा ‘लाल’
नगरपरिषद-नगरपंचायत निवडणुकांसाठी नामनिर्देशन प्रक्रियेत बदल
मुळ्यासोबत चुकूनही या दोन गोष्टी खाऊ नका…