हिवाळ्याच्या दिवसांत मोठ्या प्रमाणावर खाल्ली जाणारी मुळा ही भाजी अनेक आरोग्यदायी(health) गुणांनी परिपूर्ण आहे. मुळ्यामध्ये पाण्याचे प्रमाण जास्त असल्याने शरीर हायड्रेट राहण्यास ती मोठी मदत करते. तसेच अपचन, गॅस आणि ऍसिडिटीचा त्रास कमी करण्यासाठीही मुळा प्रभावी मानला जातो. नियमित सेवन केल्यास पचनशक्ती सुधारते आणि शरीर हलके-फुलके वाटते. वजन कमी करण्यासाठीही मूळा फायदेशीर ठरतो कारण यामध्ये फायबर मुबलक असल्याने पोट दीर्घकाळ भरल्यासारखे वाटते आणि ओव्हरइटिंगवर नियंत्रण मिळवता येते.

मात्र, मुळ्याचे आरोग्यवर्धक फायदे असले तरी काही चुकीचे फूड कॉम्बिनेशन शरीरावर नकारात्मक परिणाम करू शकतात, असा इशारा आयुर्वेद तज्ज्ञांकडून देण्यात आला आहे. जयपूरच्या (health)आयुर्वेद विशेषज्ञ किरण गुप्ता यांनी सांगितले की मुळ्यासोबत दूध आणि दहीचे सेवन टाळावे, कारण हे ‘अँटी-आहार’ मानले जाते आणि प्रकृतीवर विपरीत परिणाम करू शकते.
याशिवाय काही वैद्यकीय स्थितींमध्ये मुळा खाण्यापासून दूर राहणे आवश्यक आहे. सर्दी-खोकला, मायग्रेन किंवा अस्थमा असलेल्या व्यक्तींनी मूळ्याचे सेवन टाळावे, कारण यामुळे लक्षणे वाढू शकतात. तर सामान्य व्यक्तींनीही मुळा मर्यादित प्रमाणातच खावा, असे तज्ज्ञांचे मत आहे.

हेही वाचा :
महाराष्ट्रात १९ लाख नवीन मतदार, निवडणूक आयोगाने ७ महिन्यांत ४००,०००…
काळाचा घाला… अपघातात मराठमोळ्या अभिनेत्याचा मृत्यू…
शाळेतून घरी आली आणि…,14 वर्षीय मुलीने 19व्या मजल्यावरून मारली उडी