हिवाळ्याच्या सुरूवातीस थंडीचा सामना करण्यासाठी आहारातील बदलांना विशेष महत्त्व येते. या काळात शरीराला उबदार ठेवणारे, ऊर्जा देणारे आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारे पदार्थ खाण्यावर भर दिला जातो. अशा पदार्थांमध्ये बाजरी हे सर्वात प्रभावी आणि उपयुक्त धान्य मानले जाते. पौष्टिक तत्वांनी समृद्ध असलेली बाजरी थंडीच्या दिवसात ‘सुपरफूड’ म्हणून ओळखली जाते. यात मुबलक प्रमाणात फायबर, लोह, मॅग्नेशियम, प्रथिने आणि अँटीऑक्सिडंट्स असल्याने ती शरीरासाठी अत्यंत फायदेशीर(benefits) ठरते.

आहारतज्ज्ञ मोहिनी डोंगरे सांगतात की, दररोज सकाळी नाश्त्यात बाजरीची लापशी खाल्ल्यास दिवसभर ऊर्जा टिकून राहते आणि आळस जाणवत नाही. गूळ घालून तयार केलेली गोड लापशी किंवा भाज्यांसह केलेली मसालेदार लापशी पौष्टिकतेने भरलेली असते. हिरवे मूग घातल्यास व्हिटॅमिन बी12 ची कमतरता दूर करण्यास मदत(benefits) होते. उच्च फायबरमुळे वजन कमी करू इच्छिणाऱ्यांसाठी बाजरीची लापशी उत्तम पर्याय असून बद्धकोष्ठता आणि गॅससारख्या समस्या देखील दूर होतात.
उकडलेली बाजरी पचायला हलकी असल्याने अल्सर आणि अॅसिडिटी असलेल्यांसाठी विशेषतः फायदेशीर आहे. बाजरीतील मॅग्नेशियम रक्तदाब नियंत्रित ठेवण्यास मदत करते आणि मधुमेह व हृदयरोगाचा धोका कमी करते.बाजरीची भाकरी देखील हिवाळ्यात मोठ्या प्रमाणात खाल्ली जाते. तज्ञांच्या मते, दिवसातून दोन भाकऱ्या खाल्ल्यास शरीराला आतून उब मिळते, रक्तातील साखर नियंत्रणात राहते आणि पचनक्रिया सुधारते. ग्रामीण भागातील पारंपारिक अन्न म्हणून ओळखली जाणारी बाजरी आता फिटनेस आणि आरोग्याबद्दल जागरूक असलेल्या शहरी लोकांमध्येही वेगाने लोकप्रिय होत आहे.
थोडक्यात, बाजरी कोणत्याही स्वरूपात—लापशी, भाकरी किंवा उकडलेली—हिवाळ्यातील आरोग्यासाठी वरदानच आहे.

हेही वाचा :
शहरात डासांचा प्रादुर्भाव वाढला — उमाकांत दाभोळे यांच्याकडून महापालिका आयुक्तांकडे तातडीने धूरफवारणीची मागणी
हिवाळ्यात पेरू खाण्याचे 5 फायदे माहितीयेत का?
252 कोटींच्या ड्रग्ज प्रकरणातील आरोपीने घेतलं श्रद्धा कपूर, नोरा फतेहीसह अनेकांची नावं