आजच्या वेगवान आणि तणावपूर्ण जीवनशैलीत केस गळणे ही समस्या झपाट्याने (hair loss) वाढताना दिसत आहे. प्रदूषण, अपुरी झोप आणि चुकीचा आहार यामुळे केसांची गुणवत्ता खालावत असून अनेक जण महागड्या उपचारांचा आधार घेतात. मात्र तज्ज्ञांच्या मते, केस गळतीवर नियंत्रण मिळवण्यासाठी सर्वप्रथम आपल्या दैनंदिन आहारात बदल करणे गरजेचे आहे. कारण केसांच्या आरोग्याचा थेट संबंध शरीराला मिळणाऱ्या पोषणाशी असतो.

अतिरिक्त साखरेचे सेवन हे केस गळतीमागील एक महत्त्वाचे (hair loss) कारण मानले जाते. जास्त साखर खाल्ल्याने शरीरातील इन्सुलिनची पातळी वाढते आणि त्यामुळे अँड्रोजन संप्रेरक अधिक सक्रिय होतो. हा संप्रेरक केसांच्या कूपांवर परिणाम करून त्यांना आकुंचन पावण्यास भाग पाडतो. परिणामी केस पातळ होऊ लागतात आणि हळूहळू गळती वाढते. याशिवाय साखरेमुळे टाळूमध्ये सूज आणि जळजळ निर्माण होऊ शकते, ज्यामुळे केसांची मुळे कमकुवत होतात.

पिझ्झा, पास्ता, पांढरी ब्रेड यांसारखे रिफाइंड कार्ब्स असलेले (hair loss) पदार्थ देखील शरीरातील साखरेची पातळी झपाट्याने वाढवतात. अशा अन्नामुळे हार्मोनल असंतुलन निर्माण होऊ शकते आणि दीर्घकाळात अकाली केस गळती किंवा टक्कल पडण्याचा धोका वाढतो. त्यामुळे तज्ज्ञ संपूर्ण धान्य, डाळी आणि भाज्यांचा समावेश असलेला संतुलित आहार घेण्याचा सल्ला देतात.
वजन कमी करण्याच्या प्रयत्नात अनेक जण साखरमुक्त पेये किंवा डाएट सोडा निवडतात. मात्र कृत्रिम गोड पदार्थांचे अति सेवन टाळूच्या आरोग्यावर नकारात्मक परिणाम करू शकते. यामुळे केसांची नैसर्गिक चमक कमी होऊन ते कमकुवत होतात. तसेच कोल्ड्रिंक्सचे जास्त प्रमाणात सेवन केल्यास शरीरातील आवश्यक पोषक तत्त्वांची कमतरता निर्माण होऊ शकते.

अल्कोहोलचे जास्त सेवन केल्याने (hair loss) शरीर डिहायड्रेट होते. पाण्याची कमतरता निर्माण झाल्यास केस कोरडे पडून तुटू लागतात. शिवाय अल्कोहोलमुळे झिंकसारख्या महत्त्वाच्या खनिजांचे प्रमाण घटते, जे केसांच्या वाढीसाठी आवश्यक असते. जास्त प्रमाणात चहा किंवा कॉफी घेतल्यासही शरीरातील पोषक तत्त्वांचे शोषण कमी होऊ शकते. त्यामुळे निरोगी आणि मजबूत केसांसाठी संतुलित आहार, पुरेसे पाणी आणि योग्य जीवनशैली या गोष्टींवर भर देणे अत्यावश्यक असल्याचे तज्ज्ञ सांगतात.

हेही वाचा :

घरात हत्तीची मूर्ती कोणत्या दिशेने ठेवावी, नियम आणि फायद्यांबद्दल माहिती आहेत?

बॉलिवूडचा सर्वात जास्त बोल्ड चित्रपट, पाहण्यासाठी थिएटर बाहेर रांगेत लागायचे लोक, ज्याने इंडस्ट्री हादरवली होती

या डेंजर तुरुंगात रात्र घालवण्यासाठी लोक म्हणतात होऊ दे खर्च ! एका रात्रीचे इतके पैसे मोजायला तयार