द्राक्षे हे अनेकांच्या आवडीचे फळ असले तरी ती योग्य (favorite fruit) पद्धतीने स्वच्छ केली जातात का, हा प्रश्न महत्त्वाचा आहे. द्राक्षे गुच्छांमध्ये वाढतात आणि त्यांची साल अतिशय पातळ व नाजूक असते. त्यामुळे शेतीदरम्यान वापरलेली कीटकनाशके, धूळ आणि घाण सहजपणे त्यांच्या पृष्ठभागावर चिकटून राहतात. केवळ नळाखाली हलके धुतल्याने ती पूर्णपणे स्वच्छ होत नाहीत, असे तज्ज्ञ सांगतात.

शेती व पर्यावरणविषयक माहिती देणाऱ्या Environmental Working Group या संस्थेने 2025 मधील सर्वाधिक (favorite fruit) कीटकनाशक अवशेष आढळणाऱ्या फळांच्या यादीत द्राक्षांचा समावेश केला आहे. द्राक्ष पिकावर कीटक, बुरशी आणि रोगांपासून संरक्षण करण्यासाठी अनेक वेळा फवारणी केली जाते. द्राक्षांच्या घडात लहान भेगा आणि एकमेकांना चिकटलेली दाण्यांची रचना असल्यामुळे रसायने आत अडकून राहू शकतात. विशेषतः लहान मुलांना द्राक्षे देण्यापूर्वी ती नीट स्वच्छ करणे अत्यंत आवश्यक मानले जाते.

आरोग्यविषयक माहिती देणाऱ्या EcoNugenics या संकेतस्थळानुसार, द्राक्षे स्वच्छ करण्याची (favorite fruit) सुरुवात थंड पाण्याने करावी. द्राक्षे मोठ्या भांड्यात किंवा चलणीत ठेवून 20 ते 30 सेकंद वाहत्या पाण्याखाली हलक्या हाताने चोळावीत. यामुळे पृष्ठभागावरील धूळ आणि काही प्रमाणातील रसायने कमी होतात. जरी याने सर्व कीटकनाशके निघून जात नसली तरी पुढील स्वच्छतेसाठी ही महत्त्वाची पायरी ठरते.

यानंतर बेकिंग सोडाचा वापर प्रभावी (favorite fruit) मानला जातो. एका लिटर पाण्यात एक चमचा बेकिंग सोडा मिसळून त्यात द्राक्षे 10 ते 15 मिनिटे भिजत ठेवावीत. बेकिंग सोडाच्या क्षारीय गुणधर्मामुळे काही सामान्य कीटकनाशकांचे अवशेष कमी होण्यास मदत होते. भिजवल्यानंतर द्राक्षे पुन्हा स्वच्छ पाण्याने चांगली धुवून घ्यावीत.
पांढरा व्हिनेगर देखील नैसर्गिक पर्याय म्हणून वापरला जातो. एक भाग व्हिनेगर आणि तीन भाग पाणी मिसळून द्राक्षे 5 ते 10 मिनिटे भिजवावीत. ही पद्धत केवळ कीटकनाशकांचे अवशेष कमी करण्यासच नव्हे तर जीवाणू आणि बुरशी कमी करण्यासही मदत करते. त्यानंतर द्राक्षे स्वच्छ पाण्याने नीट धुतल्यास व्हिनेगरचा वास राहत नाही.

धुतल्यानंतर द्राक्षे पूर्णपणे कोरडी करणे (favorite fruit) तितकेच महत्त्वाचे आहे. स्वच्छ कापडाने हलक्या हाताने पुसून किंवा हवेत वाळू देऊन ती कोरडी करावीत. कोरडी द्राक्षे फ्रीजमध्ये ठेवल्यास अधिक काळ ताजी राहतात आणि बुरशी येण्याची शक्यता कमी होते. योग्य पद्धतीने स्वच्छता केल्यास द्राक्षांचा आस्वाद अधिक सुरक्षित आणि आरोग्यदायी ठरू शकतो.

हेही वाचा :

 महेंद्रसिंह धोनीवर मोठा अन्याय, सत्य समजताच येईल संताप, खळबळजनक माहिती समोर!

मोठी बातमी! बीजेपीचा बांगलादेशमध्ये झेंडा, लोकसभेची एक जागा जिंकली

आमच्या वयात अतंर जास्त असल्यामुळेच…, घटस्फोटावर प्रियांका चोप्रा स्पष्टच बोलली; ते सीक्रेट देखील सांगितलं