बॉलिवूड आणि अंडरवर्ल्डचं जुनं कनेक्शन आहे. नुकताच यूएईमधून प्रत्यार्पण करण्यात आलेल्या ताहिर डोलाच्या चौकशीदरम्यान या सिंडिकेटचे नेटवर्क झालं आहे. 252 कोटी रुपयांच्या ड्रग्ज प्रकरणातील आरोपीने धक्कादायक खुलासे केले आहेत. बॉलिवूड, राजकारण आणि अंडरवर्ल्डमधील खोल ड्रग्ज संबंध पुन्हा एकदा उघड केले आहेत. मुंबई पोलिसांच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने दुबईमध्ये राहणाऱ्या अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा सहकारी सलीम डोला याच्याकडून चालवल्या जाणाऱ्या एका मोठ्या ड्रग्ज सिंडिकेटचा पर्दाफाश केलाय. या सिंडिकेटने देशभरातील सात ते आठ राज्यांना मेफेड्रोन (एमसीएटी), म्याऊ म्याऊ आणि आइस सारख्या ड्रग्जचा(drug) पुरवठा केला आणि मोठ्या प्रमाणात परदेशातही तस्करी केल्याचे उघड झाले आहेत.

या वर्षी ऑगस्टमध्ये युएईमधून प्रत्यार्पण करण्यात आलेल्या सलीम डोला यांचा मुलगा ताहिर डोला याची चौकशी मुंबई पोलिसांकडून सुरु आहे. चौकशीदरम्यान ताहिर डोला यांनी अनेक धक्कादायक खुलासे केले. त्यांनी सांगितलं की, त्यांनी आयोजित केलेल्या ड्रग्ज(drug) पार्ट्यांमध्ये अनेक प्रमुख बॉलिवूड अभिनेते, अभिनेत्री, रॅपर आणि चित्रपट निर्माते आले होते. या पार्ट्यांमध्ये मोठ्या प्रमाणात मेफेड्रोन आणि इतर सिंथेटिक ड्रग्जचा वापर करण्यात आला होता.गोपनीय कागदपत्रांनुसार, ज्या नावांचा खुलासा झाला आहे, यात बॉलिवूड अभिनेत्री नोरा फतेही, श्रद्धा कपूर, तिचा भाऊ सिद्धांत कपूर, राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार झीशान सिद्दीकी, रॅपर लोका, चित्रपट निर्माते अब्बास-मस्तान, मॉडेल अलीशा पारकर (दाऊद इब्राहिमची बहीण हसिना पारकरचा मुलगा) आणि सोशल मीडिया व्यक्तिमत्व ओरी उर्फ ​​ओरहान यांचा नावाचा उल्लेख आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, चौकशीदरम्यान ताहिर डोलाने सांगितलं की, हे सर्व लोक केवळ मुंबई आणि गोव्यात आयोजित केलेल्या ड्रग्ज पार्ट्यांमध्ये आले होते असं नाही, तर दुबई आणि थायलंडमध्येही काही पार्ट्यामध्ये ते आले होते. जिथे भारतीय वंशाच्या व्यावसायिकांमार्फत ड्रग्जचा(drug) पुरवठा करण्यात येतो.आता, या संपूर्ण नेटवर्कची चौकशी केवळ मुंबई गुन्हे शाखाच नाही तर अंमलबजावणी संचालनालय (ईडी) देखील करत आहे. या ड्रग्ज तस्करीतून मिळणारे पैसे हवाला आणि रिअल इस्टेटद्वारे लाँडरिंग केले जात असल्याचा ईडीला संशय आहे. सूत्राने दिलेल्या माहितीनुसार मुंबई गुन्हे शाखा लवकरच या सर्वांना समन्स बजावणार असून त्यांचे जबाब नोंदवणार आहेत.

दरम्यान मुंबई पोलिसांनी 16 फेब्रुवारी 2024 रोजी कुर्लामधून परवीन बानो गुलाम शेख या महिलेला 25 कोटी रुपयांच्या मेफेड्रॉनसह अटक केली होती. तपासामध्ये विक्रेत्यांपासून उत्पादकांपर्यंत मोठी साखळीचा पदार्फाश केला असून या प्रकरणात पोलिसांनी जवळपास 15 जणांना अटक केली. परवीनला मिरा रोड इथे साजिद मोहम्मद आसिफ शेख हा अमली पदार्थ पुरवत होता, असंही समोर आलं आहे. एवढंच नाही तर साजिदच्या चौकशीत अमली पदार्थाच्या तस्करीतील मुख्य सूत्रधार सलीम शेख याचं नाव समोर आलं होतं.

हेही वाचा :

10 रुपयांचा छोटा स्टॉक ठरतोय ‘बडा धमाका’, गुंतवणूकदारांची लॉटरी लागणार?
EPFO कडून सरकारी कर्मचाऱ्यांसाठी सर्वात मोठी घोषणा!
धार्मिक विधीच्या नावाने हॉटेलमध्ये नेलं अन्…