सरकारी मालकीच्या कंपनीच्या म्हणून ओळखले जाणारे वोडाफोन (Vodafone)आयडिया किंवा Vi यांच्या शेअर्समध्ये वाढ होताना दिसून येत आहे. 2024 नंतर प्रथमच Vi ने एफपीओ किमतीच्या पुढे झेप घेतली आहे. एनएसईवर गेल्या महिन्यात शेअरमध्ये जवळपास 21% पेक्षा जास्त वाढली असून AGR थकबाकीवर कंपनीने सवलतीची अपेक्षा केल्याने वाढल्याचे म्हंटले जाते.

बिहार विधानसभा निकालांच्या पार्श्वभूमीवर एकीकडे देशांतर्गत मार्केटमध्ये विक्री होत असल्याचे दिसून येत आहे तर, दुसरीकडे शेअर्स घसरले असताना व्होडाफोन आयडिया याचे शेअर्स खरेदी करायला गुंतवणूकदारांनी रांग लावल्याचे पाहायला मिळाले. 14 नोव्हेंबर रोजी शेअर मार्केटमध्ये व्होडाफोन आयडिया लिमिटेड कंपनीचे शेअर्स जवळजवळ 5 टक्क्यांनी उसळलेले दिसले, ज्यामुळे सलग चौथ्या दिवशीही वाढ दिसून आली. तसेच, शेअरने या वाढीसह एफपीओ 11 रुपयांनी ओलांडली आहे.

गेल्या काही दिवसांपासून बाजारात Vi शेअरमध्ये गुंतवणूकदारांची (Vodafone)लाट आली असून AGR मध्ये सर्वोच्च न्यायालयाने दिलासा दिल्यानंतर गुंतवणूकदारांना आशेचा किरण दिसला आहे. चार दिवसांमध्ये Vi शेअर्सनी झेप घेत 15 टक्के शेअर्स घेतले. त्यामुळे समायोजित एकूण महसूल अर्थात AGR च्या थकबाकीच्या सवलतीच्या अपेक्षेमुळे यात वाढ झाल्याचे म्हंटले जाते. ऑगस्ट महिन्यात नीचांकी पातळीवरून शेअर जवळपास 6.12 रुपये वरुन दुपटीने वाढल्याचे दिसून येते.

यापूर्वी Vi कंपनीने एप्रिल 2024 मध्ये एफपीओद्वारे 18000 कोटी रुपयांची उभारणी केली होती. आतापर्यंत जी देशातील सर्वात मोठी फॉलो-ऑन पब्लिक ऑफरिंग होती. प्रति शेअर 11 रुपये अशी किंमत निश्चित करण्यात आली होती. त्यानंतर मात्र, 2024 चा उच्चांक तब्बल 19.18 रुपयांवर पोहोचला होता. परंतु, त्यात मोठ्या प्रमाणात घसरण झाली. अलीकडेच, सर्वोच्च न्यायालयाने व्होडाफोन आयडियाला मोठा दिलासा दिला होता. न्यायालयाने स्पष्ट केले की, त्यांना हा दिलासा केवळ अतिरिक्त मागणीच्या संबधित दिल नसून एजीआर थकबाकीशी संबंधित सुद्धा देण्यात आला आहे. व्होडाफोन आयडियाचे सध्याचे शेअर्स 4.2% वाढून 10.9 रुपयेवर पोहोचले आहेत. ज्यामुळे त्यांच्या शेअरमध्ये आतापर्यंत 38% वाढ झाली असून ती जवळपास 2023 च्या तुलनेने दुप्पट आहे.

हेही वाचा :

EPFO कडून सरकारी कर्मचाऱ्यांसाठी सर्वात मोठी घोषणा!
धार्मिक विधीच्या नावाने हॉटेलमध्ये नेलं अन्…
महिलेला भेटायला गेला, मुलाने पाहिले अन्…