संघटित क्षेत्रातील कामगारांसाठी (government)कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनाकडून एक महत्त्वाची घोषणा करण्यात आली आहे. भविष्यातील आर्थिक सुरक्षेसाठी पीएफ खाते हा सर्वांत विश्वासार्ह पर्याय मानला जातो. कर्मचाऱ्यांच्या पगारातून ठराविक रक्कम कपात होऊन EPF खात्यात जमा केली जाते आणि नियोक्त्याकडूनही तेवढीच रक्कम जोडली जाते. निवृत्ती नंतर हातात भक्कम निधी असावा, आर्थिक अडचणी येऊ नयेत यासाठी EPF हा मोठा आधार ठरतो. दरम्यान, नोकरी करणाऱ्यांच्या आर्थिक सुरक्षिततेला अधिक बळकटी देण्यासाठी EPFO ने कर्मचाऱ्यांसाठी एक विशेष सुविधा लागू केली आहे. ‘Voluntary Provident Fund’ म्हणजेच VPF या नव्या योजनेद्वारे कर्मचारी आपल्या EPF खात्यात अतिरिक्त रक्कम जमा करू शकतील. ही सुविधा पूर्णपणे सुरक्षित असून निवृत्तीनंतर मोठा आर्थिक लाभ मिळू शकतो.

EPFO च्या या योजनेचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे अतिरिक्त जमा रकमेवरही नियमित EPF प्रमाणेच 8.25% व्याजदर देण्यात येणार आहे. सध्या अनेक बँकांच्या एफडी योजनेत यापेक्षा कमी व्याज मिळते. त्यामुळे सुरक्षित गुंतवणूक शोधणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी VPF हा एक आकर्षक पर्याय ठरत (government)आहे.व्हीपीएफमध्ये कर्मचारी आपल्या पगाराच्या 100% रक्कमेसुद्धा जमा करू शकतो. म्हणजेच एखाद्याचा मासिक पगार 25,000 रुपये असेल आणि त्याला संपूर्ण रक्कम VPF मध्ये जमा करायची असेल, तर त्याला ती सुविधा उपलब्ध आहे. EPF प्रमाणेच VPF मधील रक्कम पूर्णपणे सुरक्षित असते आणि केंद्र सरकारद्वारे संरक्षित असते.

VPF योजनेत करसवलतीचेही मोठे फायदे आहेत. आयकर कायद्याच्या कलम 80C अंतर्गत 1.5 लाख रुपयांपर्यंत कर सवलत मिळते. त्याचबरोबर EPF व VPF मिळून वार्षिक 2.5 लाख रुपयांपर्यंत योगदान करले असेल, तर त्यावरील व्याजही करमुक्त राहते. सरकारी कर्मचाऱ्यांसाठी ही मर्यादा 5 लाख रुपये आहे.या योजनेंतर्गत आणखी एक आकर्षक गोष्ट म्हणजे टॅक्स-फ्री विड्रॉवल. जर कर्मचारी किमान 5 वर्षे सतत योगदान करत राहिला, तर निवृत्तीनंतर काढलेली संपूर्ण रक्कम करमुक्त असते. त्यामुळे दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी VPF हा अत्यंत फायदेशीर पर्याय ठरतो.

गुंतवणूक प्रक्रिया देखील अतिशय सोपी आहे. कर्मचार्‍यांनी आपल्या कंपनीच्या HR किंवा पेरोल विभागाशी संपर्क साधून पगारातून अतिरिक्त कपात सुरू करण्याची विनंती करायची आहे. जमा झालेली रक्कम EPF पासबुक, UMANG अॅप किंवा DigiLocker द्वारे सहज तपासता येते. भविष्यातील आर्थिक स्थैर्यासाठी VPF ही एक सुरक्षित, स्थिर आणि उच्च व्याज देणारी योजना म्हणून समोर येत आहे.

हेही वाचा :

महिलेला भेटायला गेला, मुलाने पाहिले अन्…
कोल्हापुरातील ‘या’ भागात बदलली राजकीय समीकरणे; भाजपला मिळाला ‘नवा गडी’
धर्मेंद्र ICU video लीक प्रकरण: पोलिसांची धडक कारवाई!