इचलकरंजी : शहरातील वातावरणातील अचानक बदल, आर्द्रता, धुक्याचे प्रमाण आणि हवामानातील अनिश्चिततेमुळे डेंग्यू, मलेरिया तसेच इतर व्हेक्टरजन्य आजारांचे प्रमाण वाढू लागले आहे. परिणामी डासांचा (Mosquito)प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत असून नागरिकांना अस्वस्थतेचा गंभीर सामना करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टीचे इचलकरंजी शहर पश्चिमचे उपाध्यक्ष उमाकांत नानाचंद्र दाभोळे यांनी महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक पल्लवी पाटील आणि उपायुक्त अशोक कुंभार यांच्याकडे लिखित निवेदन देत तातडीने धूरफवारणी (Fogging) सुरू करण्याची मागणी केली आहे.

दाभोळे यांनी निवेदनात स्पष्ट केले आहे की शहरातील अनेक भागांमध्ये पावसाचे पाणी साचणे, उघडी गटारे, कचऱ्याचे ढिगारे, तसेच नाल्यांमधील साचलेले पाणी यांमुळे डासांची वाढ प्रचंड वेगाने होत आहे. परिणामी शाळा–महाविद्यालये, सार्वजनिक ठिकाणे, वस्ती, गल्ली–बोळ या सर्व ठिकाणी आरोग्यधोका मोठ्याप्रमाणात निर्माण झाला आहे.
महापालिकेकडून स्वच्छता मोहीम सुरू असली तरी धूरफवारणी अद्याप अपेक्षित प्रमाणात करण्यात आलेली नाही, अशी नाराजी नागरिकांमध्ये असून ही बाब दाभोळे यांनी निवेदनात डेंग्यू (Mosquito)आणि मलेरियाच्या रुग्णसंख्येत वाढ होत असल्याने ही परिस्थिती धोकादायक बनत चालली असल्यामुळे तातडीच्या प्रतिबंधात्मक उपाययोजनांची आवश्यकता असल्याचे त्यांनी नमूद केले आहे.
निवेदनात त्यांनी शहरातील उच्च डास-प्रभावित भागांमध्ये विशेष मोहिम राबवावी, तसेच सर्व वॉर्डमध्ये धूरफवारणी मोहीम नियोजनबद्ध रितीने राबवावी, अशी मागणी केली आहे. नागरिकांच्या आरोग्याशी संबंधित हा विषय तातडीचा असल्याने लवकरात लवकर धूरफवारणी सुरू करण्याविषयी योग्य निर्देश देण्याची विनंती त्यांनी केली आहे.शहरातील वाढत्या डास त्रासामुळे उमाकांत दाभोळे यांनी आयुक्त पल्लवी पाटील व उपायुक्त अशोक कुंभार यांच्याकडे तातडीने धूरफवारणी मोहीम सुरू करण्याचे निवेदन सादर केले.

हेही वाचा :
हिवाळ्यात पेरू खाण्याचे 5 फायदे माहितीयेत का?
252 कोटींच्या ड्रग्ज प्रकरणातील आरोपीने घेतलं श्रद्धा कपूर, नोरा फतेहीसह अनेकांची नावं
सरकारी नोकरी! शैक्षणिक क्षेत्रात अनेक पदे रिक्त, संधी सोन्याची! चुकवू नका