हिवाळ्याच्या दिवसांत आरोग्याची(health) काळजी घेणे अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. या काळात शरीराला उष्णता आणि पोषण देणारे पदार्थ आहारात समाविष्ट करणे गरजेचे असते. काजू आणि बदामप्रमाणेच पिस्तेही आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर आहेत. मात्र अनेक लोक पिस्ते खाणे टाळतात. विशेषत: वजन वाढेल या गैरसमजामुळे पिस्ते खावेत की नाही, याबद्दल अनेकजण संभ्रमात असतात.

विशेषज्ञांच्या मते, रोज सकाळी पाच ते सात पिस्त्यांचे सेवन शरीरासाठी अतिशय हितकारक मानले जाते. पिस्त्यातील पौष्टिक घटक शरीराला ऊर्जा देतात, पचनशक्ती सुधारतात आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यास मदत करतात. मात्र सातपेक्षा अधिक पिस्ते खाल्ल्यास त्याचा परिणाम उलट होऊ शकतो आणि शरीरावर ताण येऊन आरोग्याला धोकादायक ठरू शकते. त्यामुळे पिस्ते फायदेशीर असले तरी मर्यादेतच सेवन करणे आवश्यक आहे.
आजारी व्यक्तींनी पिस्त्यांचा आहारात समावेश केल्यास तोंडाची चव वाढते आणि भूक सुधारण्यास मदत होते. तरीही पिस्ता सकाळी खाणे दुपार किंवा रात्रीच्या तुलनेत अधिक फायदेशीर (health)मानले जाते. अशा प्रकारे, हिवाळ्यात पिस्ता हा आरोग्य टिकवण्यासाठी उपयुक्त पर्याय आहे, मात्र त्याचे योग्य प्रमाणात सेवन करणे हेच मुख्य रहस्य आहे.

हेही वाचा :
भारतीय संघासाठी आनंदाची बातमी…
इमरान हाशमीला पुन्हा मोठा धक्का! 8 वर्षांत सलग 7वा चित्रपट फ्लॉप
देशावर मोठं संकट! पुढील 24 तास सर्वात जास्त धोक्याचे