बॉलिवूड अभिनेता (actor)इमरान हाशमी गेल्या काही वर्षांपासून मोठ्या पडद्यावर यशासाठी आसुसलेला दिसत आहे. सलग अपयशामुळे त्याच्या करिअरला आलेली मरगळ अद्यापही दूर झालेली नाही. गेल्या 13 वर्षांत इमरानचा एकही चित्रपट हिट झालेला नाही तर मागील 8 वर्षांत त्याच्या सातही चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर निराशा केली आहे. नुकताच रिलीज झालेला ‘हक’ हा चित्रपटही बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरला.इमरान हाशमी आणि यामी गौतम यांचा ‘हक’ हा चित्रपट 7 नोव्हेंबर रोजी थिएटर्समध्ये प्रदर्शित झाला. शाह बानो केसवर आधारित या चित्रपटाचे बजेट 40 ते 42 कोटी रुपये इतके होते. मात्र रिलीजच्या 10 दिवसांत चित्रपटाने केवळ 16.67 कोटी रुपये कमावले. बजेटचा अर्धाही खर्च चित्रपट वसूल करू शकला नाही.

या आठवड्यात थिएटर्समध्ये अनेक नवीन चित्रपटांनी (actor)प्रवेश केल्याने ‘हक’चे कलेक्शन वेगाने घसरले आणि आता हा चित्रपट फ्लॉपच्या दिशेने सरकला आहे. बॉक्स ऑफिसच्या सूत्रानुसार कोणतीही चित्रपट ‘हिट’ ठरण्यासाठी त्याने बजेटच्या दुप्पट कमाई करणे आवश्यक असते, परंतु ‘हक’ त्याच्या जवळपासही पोहोचू शकला नाही.
‘हक’ चित्रपटाचे 10 दिवसांचे कलेक्शन
दिवस कमाई
Day 1 1.75 कोटी
Day 2 3.35 कोटी
Day 3 3.85 कोटी
Day 4 1.05 कोटी
Day 5 1.75 कोटी
Day 6 1.15 कोटी
Day 7 1.10 कोटी
Day 8 0.65 कोटी
Day 9 1.10 कोटी
Day 10 0.92 कोटी
एकूण 16.67 कोटी
इमरान हाशमीने शेवटचा हिट चित्रपट 2011 मधील ‘द डर्टी पिक्चर’ दिला होता. त्यानंतर 2012 मध्ये आलेला ‘जन्नत 2’ हिट ठरला. यानंतर इमरानच्या एकाही चित्रपटाला चांगला प्रतिसाद मिळाला नाही.शंघाई, रश, एक थी डायन, घनचक्कर, राजा नटवरलाल, उंगली, मिस्टर एक्स, हमारी अधूरी कहानी, अजहर, राज रीबूट, व्हाय चीट इंडिया, द बॉडी, मुंबई सागा, चेहरे, सेल्फी आणि ग्राउंड झिरो. या सर्व चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर फारच कमी कमाई केली. चित्रपटाचे दिग्दर्शन सुपर्ण एस. वर्मा यांनी केले आहे. प्रमुख भूमिकेत इमरान हाशमी, यामी गौतम यांच्यासोबत वर्तिका सिंह, शीबा चड्ढा आणि दानिश हुसेन यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत.

हेही वाचा :
देशावर मोठं संकट! पुढील 24 तास सर्वात जास्त धोक्याचे
महाराष्ट्रातल्या 1 कोटी ‘लाडक्या बहिणी’ योजनेतून बाहेर?
बिहार निवडणुकीनंतर लालू यादवांच्या कुटुंबात निर्माण झालं मोठं वादळ!