गेल्या काही दिवसांपासून राज्यात हवामानात (rain)मोठे चढउतार पाहायला मिळत आहेत. नोव्हेंबरमध्ये पावसाची शक्यता कमी असताना अनेक भागांत पावसाचे ढग सक्रिय झाले आहेत. त्यामुळे हवामान विभागाने राज्यात येलो अलर्ट जारी करत पुढील काही दिवस सावधगिरी बाळगण्याचा इशारा दिला आहे. विशेषतः गारठा वाढल्याने आणि पावसाचे ढग कायम असल्याने नागरिकांनी योग्य काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

दरम्यान, पुण्यात तब्बल 10.6°c पर्यंत किमान तापमान घसरले असून गेल्या दोन दिवसांत तापमानात मोठी घसरण नोंदवली गेली आहे. परिणामी पुणेकरांना थंडीचा जोरदार कडाका जाणवत असून सकाळच्या वेळी दाट धुके आणि दव दिसत आहे. हवामान खात्याने पुढील दोन ते तीन दिवसांत तापमानात किंचित वाढ होण्याची शक्यता दर्शवली असली तरी थंडीचा गारठा टिकून राहणार आहे.

उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तापमानात मोठी घसरण झाली आहे. निफाड आणि धुळे येथे पारा थेट 8°c च्या आसपास पोहोचला असून थंडीच्या लाटेची लक्षणं दिसू लागली आहेत. उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे या भागात गारठा अधिक वाढत आहे. पहाटे दाट धुके आणि दव पडत असल्यामुळे शेती आणि आरोग्यावर त्याचा परिणाम जाणवत आहे.

मराठवाड्यातही तापमानात मोठी घसरण होत असून परभणी येथे 8.5°c तापमानाची नोंद झाली. गोंदिया, जेऊर, भंडारा येथेही तापमान 10°c पेक्षा कमी नोंदले गेले आहे. या पार्श्वभूमीवर हवामान खात्याने सावधगिरी म्हणून येलो अलर्ट जारी केला आहे. नागरिकांनी विशेषतः पहाटे आणि रात्री बाहेर पडताना काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

राज्यात थंडीचा कडाका वाढत असताना दक्षिण भारतात अतिमुसळधार पावसाचा(rain) इशारा देण्यात आला आहे. तामिळनाडू , केरळ आणि आंध्र प्रदेशमध्ये 17 ते 20 नोव्हेंबरदरम्यान प्रचंड पावसाची शक्यता वर्तवली गेली आहे. याच दरम्यान काही भागांत विजांचा कडकडाट, पूरस्थिती आणि जोरदार वाऱ्यांचा धोका देखील हवामान खात्याने व्यक्त केला आहे.

केरळमध्ये कालपासून अनेक भागांत पाऊस सुरू झाला असून पुढील काही दिवस पावसाची तीव्रता अधिक वाढेल असा अंदाज आहे. मुसळधार ते अतिमुसळधार पावसामुळे मच्छिमारांना समुद्रात न जाण्याचा कडक सल्ला देण्यात आला आहे. काही भागांत ऑरेंज अलर्ट जारी करून आपत्ती व्यवस्थापन यंत्रणांना तयार राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. पंजाब आणि हरियाणामध्येही थंडीची लाट येण्याची शक्यता असून उत्तर भारतात तापमान आणखी खाली जाण्याचा अंदाज आहे.

हेही वाचा :

महाराष्ट्रातल्या 1 कोटी ‘लाडक्या बहिणी’ योजनेतून बाहेर? 
बिहार निवडणुकीनंतर लालू यादवांच्या कुटुंबात निर्माण झालं मोठं वादळ!
या बँकेने घेतला मोठा निर्णय…