हिवाळ्याची चाहूल लागताच बाजारात येणारी ‘चाकवत’(Chakavat) ही पारंपारिक हिरव्या पालेभाज्यांपैकी एक भाजी पुन्हा एकदा आरोग्यप्रेमींसाठी वरदान ठरत आहे. चंदनबटवा किंवा बथुआ नावानेही ओळखली जाणारी ही भाजी आयुर्वेदात नैसर्गिक डिटॉक्सिफायर म्हणून मान्यता पावलेली आहे.

विटामिन A आणि C सोबत कॅल्शियम व आयर्नने समृद्ध असलेल्या चाकवतचे नियमित सेवन पचनक्रिया सुधारण्यास, बद्धकोष्ठता कमी करण्यास आणि पोटातील गॅस, अॅसिडिटीसारख्या समस्यांवर दिलासा देण्यास उपयुक्त ठरते. रक्तशुद्धीकरण आणि त्वचेची चमक वाढवण्याचे गुणधर्म असल्याने त्वचा व केसांच्या आरोग्यासाठीही ती फायदेशीर मानली जाते. संधीवात, गुडघेदुखी आणि ब्लड प्रेशर(Chakavat) नियंत्रित ठेवण्यातही या भाजीतील पोषक घटक मदत करतात, असे तज्ज्ञ सांगतात.

हिवाळ्यात शरीराला उब देणाऱ्या भाज्यांमध्ये चाकवत अग्रस्थानी असल्याने अनेक घरांमध्ये तिचे पराठे, भाजी आणि सूप लोकप्रिय होत आहेत. मात्र या भाजीचे उष्ण गुणधर्म लक्षात घेता काही लोकांनी सावधगिरी बाळगणे गरजेचे असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे. चाकवतामध्ये ऑक्सलेटचे प्रमाण जास्त असल्याने किडनी स्टोन किंवा मुतखड्याचा त्रास असणाऱ्यांनी ती मर्यादित प्रमाणातच खावी.

तसेच गर्भवती महिलांनीही डॉक्टरांच्या सल्ल्यानेच चाकवत आहारात समाविष्ट करण्याची सूचना करण्यात येत आहे. चाकवतामधील भरपूर फायबर मलप्रवृत्ती सुरळीत ठेवते आणि पचनसंस्था मजबूत करण्यास मदत करते, त्यामुळे हिवाळ्यातील संतुलित व पौष्टिक आहाराचा हा महत्त्वाचा घटक असल्याचे पोषणतज्ज्ञांनी सांगितले.

हेही वाचा :

१५ मिनिटांमध्ये सकाळच्या नाश्त्यासाठी बनवा साऊथ इंडियन बेन्ने डोसा
अजित पवारांच्या नातेवाईकांना ₹5,000,000,000चं BMC रुग्णालय…
महाराष्ट्रातील शाळा-कॉलेजच्या विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी