राज्यातील कानाकोपऱ्यात राहणाऱ्या विद्यार्थ्यांना(school) एसटी बस खूप उपयोगी पडते. शाळा-कॉलेजमध्ये जाण्यासाठी हा पर्याय स्वस्त आणि उत्तम ठरतो.दरम्यान महाराष्ट्र सरकारने शाळा-महाविद्यालयांच्या विद्यार्थ्यांसाठी मोठी भेट दिली आहे. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी यासंदर्भात गुड न्यूज दिलीय. काय म्हणाले प्रताप सरनाईक? सविस्तर जाणून घेऊया.विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक सहलीसाठी राज्य रस्ते वाहतूक महामंडळ म्हणजेच एमएसआरटीसी यंदा मोठ्या संख्येने नव्या बस उपलब्ध करुन देणार आहे. याशिवाय सहलीच्या भाड्यात 50 टक्के सूटदेखील मिळणार आहे. दिवाळी सुट्टीनंतर विद्यार्थी उत्साहाने सहलीची वाट पाहत असतात. त्यामुळे विद्यार्थ्यांना स्वस्त आणि सुरक्षित प्रवास देण्यासाठी ही योजना असल्याचे असे मंत्री म्हणाले.

एमएसआरटीसीचे 251 डेपो दररोज शाळा(school)-कॉलेजांना 800 ते 1000 नव्या बस देणार आहेत. मंत्र्यांच्या कार्यालयाच्या निवेदनात यासंदर्भातील माहिती देण्यात आलीय. या व्यवस्थेमुळे शैक्षणिक प्रवास सोपा होणार असल्याचे सरनाईक म्हणाले. विद्यार्थ्यांसाठी परवडणारी आणि सुरक्षित सहल ही आमची प्राथमिकता आहे. राज्य सरकार या सहलींना पूर्ण पाठिंबा देत असून त्यात 50% भाडेसवलत देणार असल्याची घोषणा यावेळी सरनाईकांनी केली. यामुळे विद्यार्थी ऐतिहासिक-धार्मिक स्थळांना सहज भेट देऊ शकणार आहेत. नोव्हेंबर 2024 ते फेब्रुवारी 2025 पर्यंत एमएसआरटीसीने शैक्षणिक सहलीसाठी 19 हजार 624 बस पुरवल्या. यातून सरकारला 92 कोटी रुपयांचा महसूल मिळाला. ही यशस्वी कामगिरी पाहता यंदा आणखी मोठ्या प्रमाणात बस उपलब्ध करुन दिल्या जाणार आहेत. मंत्री सरनाईक यांनी 2025-26 साठी डेपो व्यवस्थापक आणि स्टेशन प्रमुखांना शाळा-कॉलेजांशी समन्वय साधण्याचे आदेश दिले आहेत.

डेपो प्रमुख आणि स्टेशन अधिकाऱ्यांना मुख्याध्यापकांना भेटून सहलीची योजना आखण्यास सांगितले आहे. ते राज्यातील महत्त्वाच्या ऐतिहासिक आणि धार्मिक ठिकाणांना भेटीचे आयोजन करणार आहेत. यामुळे विद्यार्थ्यांना शिक्षणाबरोबरच संस्कृतीची ओळख होण्यास मदत होईल. सरकारने घेतलेल्या या पुढाकारामुळे शैक्षणिक सहलींना चालना मिळेल यासोबतच एमएसआरटीसीला अधिक महसूल मिळणार आहे. एमएसआरटीसीने केलेली ही घोषणा विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आहे. स्वस्त भाडे आणि नव्या बसांमुळे पालकांचा भार कमी होणार आहे. तर विद्यार्थ्यांना सुरक्षित प्रवासाची हमी मिळणार आहे. राज्यभरातील शैक्षणिक संस्थांना याचा थेट लाभ होणार आहे.

हेही वाचा :

गुड न्यूज! सरकारी कर्मचाऱ्यांना ‘या’ कामासाठी मिळणार 10 दिवसांची पगारी रजा
“माझ्यासोबत संबंध ठेवले नाहीस तर…” 14 वर्षांपासून लैंगिक अत्याचार…
राज्यात मोठा राजकीय भूकंप! दोन्ही शिवसेना एकत्र