नाशिकमध्ये भोंदूबाबाच्या धक्कादायक कृत्यांचा पर्दाफाश झाला असून समाजात तीव्र संतापाची लाट उसळली आहे. “संबंध ठेवले नाही तर तुझ्या कुटुंबातील कुणाचा तरी बळी जाईल” अशी भयानक धमकी देत एका महिलेवर तब्बल 14 वर्षे लैंगिक अत्याचार केल्याचे उघड झाले आहे. जादूटोण्याची भीती दाखवत आणि तांत्रिक विधींचे आमिष दाखवत या भोंदूबाबाने पीडितेवर मानसिक, शारीरिक (Sexual)तसेच आर्थिक शोषण केल्याचा गंभीर आरोप आहे.

या भोंदूबाबाचे नाव गणेश जगताप (धारणगाव, निफाड तालुका) असे असून इंदिरानगर पोलीस ठाण्यात त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अत्याचारासोबतच (Sexual)या बाबाने पीडितेच्या कुटुंबाची 50 लाख रुपयांची फसवणूक केल्याचे समोर आले आहे. तक्रारीनुसार, “तू मला आवडतेस… तुला मिळवण्यासाठी मी स्मशानात पूजा करतो” अशा विचित्र दाव्यांनी दबाव आणत 2010 पासून अनेक वेळा अत्याचार सुरु होते. त्याच्याकडील एका पुस्तकात पीडितेच्या पती व मुलांची नावे लिहून ठेवली होती आणि त्यांना इजा पोहोचवण्याची धमकी देऊन तो तिच्यावर अत्याचार करीत होता.

गुन्हा दाखल होताच भोंदूबाबाला याची खबर मिळाली आणि त्याने तातडीने पलायन केले. आरोपी सध्या फरार असून त्याच्या अटकेसाठी पोलिसांचे विशेष पथक तयार करण्यात आले आहे. आरोपीपर्यंत गुन्ह्याची माहिती इतक्या लवकर कशी पोहोचली, असा सवाल संतप्त नागरिकांकडून उपस्थित होत आहे.या प्रकरणानंतर आणखी काही महिला पुढे येण्याची शक्यता वर्तवली जात असून पोलिसांनी सर्वांना पुढे येऊन तक्रार करण्याचे आवाहन केले आहे. आरोपीला तातडीने अटक करून कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी नागरिकांमधून जोर धरत आहे.

हेही वाचा :

सावधान… दिवसा किती पिस्ता खाणे आरोग्यासाठी फायदेशीर आहे जाणून घ्या 
भारतीय संघासाठी आनंदाची बातमी…
इमरान हाशमीला पुन्हा मोठा धक्का! 8 वर्षांत सलग 7वा चित्रपट फ्लॉप