मालेगाव तालुक्यातील एका गावात साडेतीन वर्षांच्या चिमुकलीवर झालेल्या निर्घृण अत्याचार आणि हत्येच्या घटनेने संपूर्ण परिसर हादरून गेला आहे. रविवारी सायंकाळी चॉकलेटचे आमिष दाखवत आरोपी विजय संजय खैरनार याने चिमुकलीला घरी नेले आणि काही वेळातच तिचा दगडाने ठेचलेला मृतदेह (murder)गावाजवळील टॉवरच्या बाजूला आढळून आला. कुटुंबीयांनी मुलगी दिसेनाशी झाल्याने शोध घेतला असता इतर बालकांनी ती विजयसोबत गेल्याची माहिती दिली.

पोलिसांनी तत्काळ तपास सुरू करून आरोपीला रातोरात अटक केली असून प्राथमिक चौकशीत अत्याचारानंतर खून केल्याचे उघड झाले आहे. या भयानक घटनेने ग्रामस्थांचा संताप उफाळून आला असून आरोपीला गावातच फाशी देण्याची मागणी करत सोमवारी ग्रामस्थांनी मालेगाव–कुसुंबा महामार्गावर रास्ता रोको आंदोलन केले. संतप्त नागरिकांनी घोषणाबाजी करत महामार्गावर टायर प्रज्वलित करून घटनेचा निषेध व्यक्त केला.
मंत्री दादा भुसे, पोलिस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांसह वरिष्ठ अधिकाऱ्यांनी गावाला भेट देऊन पीडित कुटुंबीयांची भेट घेतली. सोमवारी आरोपीला न्यायालयात हजर केले असता त्याला 20 नोव्हेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. दरम्यान, मालेगाव वकील संघाने आरोपीचे बाजू मांडण्यास नकार(murder) दिल्याचे जाहीर केले असून या अमानुष कृत्याविरोधात संपूर्ण तालुक्यात संतापाचे वातावरण पसरले आहे.

हेही वाचा :
कोणत्याही बँक किंवा कंपनीकडून कर्ज घेण्यापूर्वी ‘या’ गोष्टी पहा, सावध रहा
आयटी पार्कजवळ भीषण अपघात; 20 वर्षीय तरुणीचा मृत्यू
आज इतक्या हजारांनी स्वस्त झालं सोनं, वाचा भाव