जर तुम्ही लवकरच कर्ज घेण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी ही महत्त्वाची बातमी आहे. अचानक पैशांची गरज भासल्यावर अनेकजण बँका (bank)किंवा वित्तीय संस्थांकडून पर्सनल लोन घेतात. पर्सनल लोन हे असुरक्षित कर्ज असल्याने त्याचे व्याजदर इतर कर्जांच्या तुलनेत जास्त असतात. तरीही आपली आवश्यक गरज भागवण्यासाठी लोक हे कर्ज घेतात. परंतु कर्ज घेण्याच्या घाईत अनेकजण मोठ्या फसवणुकीचे बळी ठरतात. म्हणूनच पर्सनल लोन घेताना काही गोष्टींकडे विशेष लक्ष देणे अत्यंत गरजेचे आहे.

अनेक फसवणूक करणाऱ्या कंपन्या किंवा अॅप्स ग्राहकांना आकर्षक ऑफर देऊन जाळ्यात ओढतात. कर्ज मंजूर होण्यापूर्वीच शुल्क मागितले जात असेल तर तो निश्चितच घोटाळा असू शकतो, कारण कायदेशीर कंपन्या कधीही आगाऊ पैसे मागत नाहीत; त्या नेहमी कर्जाच्या रकमेतूनच शुल्क वजा करतात. त्याचप्रमाणे, जर कंपनी तुमची कागदपत्रे, ओळखपत्र, आयकर रिटर्न किंवा बँक(bank) स्टेटमेंट तपासत नसेल तर तेही संशयास्पद आहे. काही कंपन्या कमी क्रेडिट स्कोअर असूनही तत्काळ कर्ज मिळेल, कमीत कमी व्याजदर, काही मिनिटांत पैसे अशा आकर्षक ऑफर देतात.
पण अशा ऑफर्स बहुधा फसवणूकच असतात. सर्वात धोकादायक बाब म्हणजे जर कुणी तुमची वैयक्तिक माहिती, एटीएम पिन किंवा ओटीपी मागत असेल, तर तो निश्चित घोटाळाच आहे. अशा वेळी त्वरित सावधानता बाळगा आणि कोणतीही माहिती शेअर करू नका. तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार, पर्सनल लोन घेताना नेहमी विश्वासार्ह बँक किंवा मान्यताप्राप्त वित्तीय संस्थाच निवडा आणि कोणत्याही आकर्षक ऑफरच्या आहारी जाऊ नका.

हेही वाचा :
आयटी पार्कजवळ भीषण अपघात; 20 वर्षीय तरुणीचा मृत्यू
आज इतक्या हजारांनी स्वस्त झालं सोनं, वाचा भाव
इंडिया अ संघाचा आज शेवटचा लीग सामना; विजय मिळवला तर…उपांत्य फेरीत पोहोचणार