लग्नसराईचे दिवस सुरू झाले आहेत. लग्न म्हटलं की दागिन्यांची(Gold) खरेदी ही आलीच. दिवाळीआधी सोनं-चांदीचे भाव गगनाला भिडले होते. मात्र आता सोन्याचे दर काहीसे घसरले आहेत. आज पुन्हा एकदा सोन्याचा भाव कमी झाला आहे. काय आहे आजचा दर जाणून घेऊयात.

गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या दरात सातत्याने चढ-उतार होताना दिसतेय. सोनं 9 हजारांनी तब्बल स्वस्त झालं आहे. तुम्हीदेखील लग्नसराईचे दागिने खरेदी करण्याचा विचार करत असाल तर ही संधी सोडू नका. आज 24 कॅरेट सोन्याच्या दरात तब्बल 2 हजारांइतकी घट झाली आहे. तर 1,68,900 हजार रुपये किलोवर चांदी स्थिरावली आहे.
आज 24 कॅरेट सोन्याच्या(Gold) दरात तब्बल 1,740 रुपयांची घसरण झाली असून प्रतितोळा 1,23,660 रुपयांवर पोहोचले आहे. तर 22 कॅरेट सोन्याच्या दरात 1,600 रुपयांची घट झाली असून 1,13,350 रुपयांवर स्थिरावले आहे. 18 कॅरेट सोन्याच्या दरात 1,310 रुपयांनी घट झाली असून प्रतितोळा सोनं 92,740 रुपयांवर स्थिरावले आहे.
आजचा सोन्याचा भाव काय?
- 10 ग्रॅम सोनं किंमत
10 ग्रॅम 22 कॅरेट 1,13,350 रुपये
10 ग्रॅम 24 कॅरेट 1,23,660 रुपये
10 ग्रॅम 18 कॅरेट 92,740 रुपये
- 1 ग्रॅम सोनं किंमत
1 ग्रॅम 22 कॅरेट 11,335 रुपये
1 ग्रॅम 24 कॅरेट 12,366 रुपये
1 ग्रॅम 18 कॅरेट 9,274 रुपये
- 8 ग्रॅम सोनं किंमत
8 ग्रॅम 22 कॅरेट 90,680 रुपये
8 ग्रॅम 24 कॅरेट 98,928 रुपये
8 ग्रॅम 18 कॅरेट 74,192 रुपये
- मुंबई – पुण्यात कसे असतील सोन्याचे दर?
10 ग्रॅम 22 कॅरेट 1,13,350 रुपये
10 ग्रॅम 24 कॅरेट 1,23,660 रुपये
10 ग्रॅम 18 कॅरेट 92,740 रुपये

हेही वाचा :
इंडिया अ संघाचा आज शेवटचा लीग सामना; विजय मिळवला तर…उपांत्य फेरीत पोहोचणार
वर-वधूसमोर ठेवण्यात आल्या बॉड्या… दृश्य पाहून वर्हाडीही थबकले पण सत्य काही वेगळंच; Video Viral
इचलकरंजी वस्त्रनगरीत पुन्हा वेग – बिहार निवडणुकीनंतर परप्रांतीय कामगारांच्या परतीने उद्योगधंद्यांना नवा श्वास