गेल्या काही दिवसांपासून सोने (Gold)आणि चांदीच्या बाजारात मोठे चढ-उतार पाहायला मिळत आहेत. दिवाळीपूर्वी सोन्याचे दर भडकले होते. मात्र सणानंतर किंमतीत घट होण्याचा कल दिसत होता. आता पुन्हा एकदा सोने स्वस्त झाल्याने सर्वसामान्य ग्राहकांना दिलासा मिळाला आहे. विशेषतः लग्नसराईच्या मोसमात ही घसरण ग्राहकांसाठी मोठी सुवर्णसंधी मानली जात आहे.आजच्या व्यवहारात सोन्याच्या दरात लक्षणीय घसरण नोंदवण्यात आली. दिवाळीच्या आधी उच्चांक गाठलेले सोने आज अनेक प्रमुख शहरांत मोठ्या प्रमाणात स्वस्त झाले आहे. त्यामुळे सोने खरेदीचा विचार करणाऱ्यांसाठी हे भाव आकर्षक ठरत आहेत. राजधानी दिल्लीपासून मुंबई, पुणे, बंगळुरू अशा शहरांत सोन्याच्या किमतीत झालेली घसरण लक्षवेधी ठरली आहे.

दिल्लीच्या बाजारात 24 कॅरेट सोन्याची किंमत आज 1,25,220 रुपये प्रति 10 ग्रॅम इतकी खाली आली आहे. काही आठवड्यांपूर्वी या दराने 1.30 लाखांचा टप्पा ओलांडला होता. त्यामुळे दिल्लीतील ग्राहकांसाठी हा मोठा दिलासा आहे. लग्नसराईच्या हंगामात सोन्याचे(Gold) दर कमी झाल्याने बाजारात खरेदीची चांगलीच लगबग दिसून येत आहे. 22 कॅरेट सोन्याबाबत बोलायचे झाल्यास, दिल्लीमध्ये त्याची किंमत 1,14,800 रुपये प्रति 10 ग्रॅम इतकी झाली आहे. अमेरिकन फेडरल रिझर्व्हकडून होणाऱ्या व्याजदर कपातीसंदर्भातील अनिश्चिततेमुळे जागतिक बाजारात सोने दबावाखाली असल्याचे तज्ञांचे निरीक्षण आहे. या जागतिक घडामोडींचा थेट परिणाम भारतीय स्वर्णबाजारावर होताना दिसतो आहे.

मुंबई, चेन्नई आणि कोलकाता या प्रमुख महानगरांमध्येही आज सोन्याच्या दरात घसरण दिसून आली. या शहरांत 22 कॅरेट सोन्याची किंमत 1,14,640 रुपये प्रति 10 ग्रॅम तर 24 कॅरेटची किंमत 1,25,070 रुपये प्रति 10 ग्रॅम नोंदवली गेली आहे. काही दिवसांत सोन्याच्या बाजाराने घेतलेली ही उलटफेर ग्राहकांसाठी फायदेशीर ठरली आहे.महाराष्ट्रातील पुणे आणि कर्नाटकातील बंगळुरू या शहरांमध्येही सोन्याचे दर समान पातळीवर खाली आले आहेत. दोन्ही शहरांत 24 कॅरेट सोन्याचा भाव 1,25,070 रुपये प्रति 10 ग्रॅम तर 22 कॅरेटचा भाव 1,14,640 रुपये प्रति 10 ग्रॅम इतका झाला आहे. लग्नांमध्ये दागिने खरेदीसाठी गर्दी असते, त्यामुळे या घसरणीचा सकारात्मक परिणाम सोनारांच्या व्यवसायावरही दिसणार आहे.

हेही वाचा :

सीएनजी पुरवठा कधीपर्यंत सुरु होणार? MGL ने दिलं अपडेट…
जमिनीच्या स्टॅम्प ड्यूटीबाबत राज्य सरकरने घेतला मोठा निर्णय!
एलपीजी करारामुळे गॅस सिलिंडर स्वस्त होणार…