आजच्या आधुनिक काळात आधार कार्ड (Aadhaar card)सारखी डिजिटल आयडी स्वत:ची ओळख सांगायला अत्यंत महत्वाची मानली जाते. आधार कार्डवर तुमच्या सर्व सुविधा अवलंबून आहेत. परंतु, याचा गैरवापर होण्याची ही शक्यता नाकारता येत नाही. अशा महत्त्वाच्या कागदपत्राचा गैरवापर टाळण्यासाठी केंद्र सरकार आणि युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडिया ने नवीन आधार कार्ड निर्माण करायचा निर्णय घेतला आहे. आधार अधिक सुरक्षित करण्यासाठी त्याचे स्वरूप बदलले जाईल. UIDAI आता आधार कार्डवर तुमचं नाव किंवा पत्ता नसेल मात्र, कार्डवर फोटो असलेला QR कोड असेल. ज्यात गोपनीय माहिती सुरक्षित राहील. आधार कार्डवर पूर्वी लिहिलेले नाव, पत्ता आणि आधार कार्ड क्रमांक काढून टाकले जाईल.

वैयक्तिक माहितीचा गैरवापर रोखण्यासाठी आणि ऑफलाइन पडताळणी सरळ-सोपी करण्यासाठी युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडिया आधार कार्डधारकाचा(Aadhaar card) फोटो आणि QR कोड असलेले आधार कार्ड जारी करण्याचा विचार करत आहे. UIDAI चे मुख्य कार्यकारी अधिकारी भुवनेश कुमार यांनी हॉटेल, विमानतळ, सुविधा संस्थांसारख्या संस्थांकडून ऑफलाइन पडताळणीला मदत तसेच, वैयक्तिक गोपनीयता राखून वय पडताळणी प्रक्रिया वाढविण्यासाठी डिसेंबरमध्ये एक नवीन नियम आणण्याचा विचार करत असल्याची माहिती दिली.
कार्डवर कोणतेही अतिरिक्त तपशील आवश्यक आहे का? याचा विचार करण्यात येईल. त्याव्यातरिक्त, त्यात एक फोटो आणि QR कोड असलेले आधार कार्ड निर्माण करण्यात येईल. ज्यामुळे तुमची सर्व माहिती गोपनीय आणि अचूक राहील आणि वैयक्तिक माहितीचा गैरवापर टाळणे शक्य होईल.UIDAI कायद्यानुसार, एखाद्या व्यक्तीचा आधार क्रमांक किंवा बायोमेट्रिक माहिती ऑफलाइन पडताळणीसाठी गोळा, वापरली किंवा संग्रहित केली जाऊ शकत नाही. तथापि, अनेक संस्था आधार कार्डच्या छायाप्रती गोळा करतात आणि साठवतात, ज्यामुळे त्यांच्या वैयक्तिक माहितीची फसवणूक किंवा गैरवापर होण्याची शक्यता असते. हे टाळण्यासाठी, सर्व आधार माहिती आता गुप्त ठेवली जात आहे, ऑफलाइन पडताळणीला प्रतिबंधित केले जात आहे आणि वैयक्तिक माहितीचा गैरवापर रोखला जात आहे.
भारतात आधार पडताळणी धारकाच्या संमतीशिवाय करता येत नाही आणि असे करणाऱ्या कोणत्याही संस्थेला ₹1 कोटी पर्यंत दंड होऊ शकतो. ही संमती बायोमेट्रिक किंवा इलेक्ट्रॉनिक स्वरूपात मिळवावी लागते, जी धारकाकडून OTP, फिंगरप्रिंट, आयरीस इत्यादीद्वारे मिळवता येते. फक्त UIDAI द्वारे अधिकृत संस्था आणि बँका आधार पडताळणी करू शकतात. वापरकर्ते त्यांचा बायोमेट्रिक डेटा देखील लॉक करू शकतात, ज्यामुळे फक्त OTP वापरता येतो. जर कोणी आधार क्रमांकाचा गैरवापर केला तर त्याला मोठा दंड देखील होऊ शकतो.

हेही वाचा :
बछड्यावर हात उचलताच सिंहीणी रागातच उठली, थेट जंगलाच्या राजालाच मारली थप्पड; मजेदार Video Viral
एकाच फोनमध्ये 2-3 WhatsApp अकाऊंट चालवता येणार?
संजय पाटील यड्रावकर व राजू शेट्टींच्या पीएमध्ये सभागृहातच खडाजंगी