कोल्हापूर – जिल्ह्यातील नगरपरिषदेच्या निवडणुकांमध्ये(elections) रंगत हळूहळू वाढत आहे. काल (ता.१८) जयसिंगपूर नगरपरिषदेत उमेदवारी अर्ज छाननीच्या दिवशी सभागृहात हाय व्होल्टेज ड्रामा घडला. माजी मंत्री राजेंद्र पाटील यड्रावकरांचे बंधू आणि नगराध्यक्ष पदाचे उमेदवार संजय पाटील यड्रावकर आणि माजी खासदार राजू शेट्टी यांचे वैयक्तिक सहाय्यक स्वस्तिक पाटील यांच्यात जोरदार खडाजंगी झाली.

वादाची सुरुवात राजर्षी शाहू आघाडीने शिरोळ तालुका विकास आघाडीवर केलेल्या आरोपांमुळे झाली. दोन्ही गटांमध्ये हेवेदावे वाढल्याने सभागृहात तणावाचे वातावरण निर्माण झाले. संजय पाटील यड्रावकर यांनी स्वस्तिक पाटील यांना “तुमचा काय संबंध, बाहेर जा” असा सवाल केला, तर स्वस्तिक पाटील यांनी “माझ्याकडे आघाडीच्या कागदपत्रांची माहिती आहे; बाहेर काढायचे असल्यास दोघांनाही बाहेर यावे लागेल” असा जबरदस्त प्रतिसाद दिला.

निवडणूक(elections) निर्णय अधिकाऱ्यांनी दोघांनाही आपले मुद्दे मांडण्याची संधी दिली, मात्र दोन्ही पक्षांमध्ये प्रोसेडिंगसंदर्भातील वाद सुरू राहिला. अखेर मध्यस्थी करून निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी शांतता निर्माण केली, पण निवडणूक कार्यालयाबाहेर रात्री उशिरापर्यंत कार्यकर्त्यांची गर्दी सुरू होती.

या वादानंतर माजी खासदार राजू शेट्टी यांनी जिल्हाधिकारी यांना फोन करून मेरिटवर निकाल देण्याचे निर्देश दिले आणि दबाव तंत्र वापरल्यास मोर्चा काढण्याचा इशारा दिला. रात्री वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या चर्चेनंतर शिरोळ तालुका विकास आघाडीचे सर्व अर्ज कायदेशीर ठरले, यावर कार्यकर्त्यांनी जल्लोष केला.

हेही वाचा :

मोफत रेशन योजनेत मोठी कारवाई..; 2.25 कोटी अपात्र लाभार्थ्यांची वगळली नावे
नागरिकांनो सावधान! १९, २० नोव्हेंबरला राज्यावर मोठं संकट
हिवाळ्यात गाडीचं इंजिन होऊ शकतं खराब, ‘या’ चुका करू नका!