हिवाळ्याचा काळ फक्त माणसांसाठीच नाही, तर कारच्या इंजिनसाठीही(engines)आव्हानात्मक असतो. कमी तापमानामुळे इंजिन ऑईल जाड होऊ शकते आणि इंजिनवर जास्त ताण येतो, ज्यामुळे त्याचे आयुर्मान कमी होऊ शकते. अनेक कार मालक फक्त किलोमीटरच्या आधारावर इंजिन ऑईल बदलतात, परंतु हंगामाचा परिणाम न लक्षात घेणे मोठी चूक ठरू शकते.

हिवाळा सुरू होण्यापूर्वी इंजिन (engines)ऑईल तपासणे अत्यंत गरजेचे आहे. ऑईल बदलण्याचा निर्णय ऑईलच्या प्रकारावर आणि ड्रायव्हिंग पद्धतीवर अवलंबून असतो. सामान्य परिस्थितीत उत्पादक 5,000 ते 10,000 किलोमीटरनंतर ऑईल बदलण्याचा सल्ला देतात, तर काही वेळा सहा महिने ते एक वर्ष असा कालावधीही सुचवला जातो. मात्र थंड हवामानात, विशेषत: थोड्या अंतरावर वारंवार गाडी चालवणार्‍यांनी ऑईल लवकर तपासणे आणि बदलणे आवश्यक असते.

विशेषतः सिंथेटिक ऑईल हिवाळ्यात अधिक योग्य मानले जाते, कारण ते कमी तापमानातही इंजिनचे कम्बशन सुरळीत ठेवते. इंजिन ऑईल निवडताना योग्य व्हिस्कोसिटी ग्रेड निवडणे अत्यंत महत्त्वाचे आहे. कारच्या मॅन्युअलमध्ये दिलेल्या ग्रेडप्रमाणेच ऑईल वापरणे सुरक्षित राहते. ‘W’ आधीचा अंक जितका कमी, तितके ऑईल थंडीत अधिक पातळ राहते. योग्य आणि उच्च प्रतीचे सिंथेटिक ऑईल वापरल्यास इंजिनची कार्यक्षमता सुधारते आणि आयुष्य वाढते.

हेही वाचा :

लाईव्ह शोमध्ये भारतीय तिरंगा फडकावणारा पाकिस्तानी रॅपर कोण?
चेन्नई सुपरकिंग्स IPL 2026 ऑक्शनमध्ये ‘या’ खेळाडूंवर लावणार मोठी बोली?
मशीनला चिपकली, गोल गोल फिरली अन्… चित्तथरारक Video Viral