पाकिस्तानचा लोकप्रिय आणि प्रसिद्ध रॅपरपैकी एक असलेला तल्हा अंजुमला एका लाइव्ह स्टेज शोदरम्यान भारतीय तिरंगा उचलणे महागात पडले आहे(Indian). पाकिस्तानमध्ये त्याच्या या कृतीवर मोठ्या प्रमाणावर टीका होत आहे. त्याच्या भारतीय ध्वजासहच्या काही फोटोंनी सोशल मीडियावर धुमाकूळ घातल्यानंतर पाकिस्तानी नेटकऱ्यांनी त्याला प्रचंड ट्रोल केलं आहे.मात्र, तल्हा अंजुमने कुठलीही सफाई देत न बसता, उलट ट्रोल करणाऱ्यांना करारा प्रतिसाद दिला आहे. तल्हा अंजुमने एक्स (माजी ट्विटर) वर एक पोस्ट शेअर करत संपूर्ण प्रकरणावर आपली भूमिका मांडली आहे.

त्याने लिहिले की, ‘माझ्या मनात कुणाबद्दलही द्वेष नाही. माझ्या कलेला कोणत्याही सीमा नाहीत. भारतीय ध्वज लहरवल्याने वाद होत असेल तर होऊ द्या. मी हे पुन्हा करीन. मी कधीही मीडिया, युद्धाची भाषा बोलणाऱ्या सरकारांनी किंवा त्यांच्या प्रचाराने प्रभावित झालो नाही. उर्दू रॅपने नेहमीच सीमा ओलांडल्या आहेत आणि पुढेही तसाच राहील.’तल्हा अंजुम 16 नोव्हेंबर रोजी नेपाळमध्ये एका मोठ्या कॉन्सर्टसाठी गेला होता. परफॉर्मन्सदरम्यान प्रेक्षकांपैकी एका भारतीय चाहत्याने स्टेजवर भारतीय तिरंगा उचलून फेकला. तो झेंडा तल्हाने हातात घेतला आणि खांद्यावर ठेवत काही क्षण तो उंचावला. त्याच्या या कृतीचा फोटो व्हायरल होताच पाकिस्तानमध्ये संतप्त प्रतिक्रिया उमटू लागल्या.
सध्याच्या भारत(Indian)-पाकिस्तान संबंधांच्या तणावपूर्ण परिस्थितीत एका पाकिस्तानी कलाकाराने भारतीय ध्वजाचा सन्मान केल्यामुळे काही लोकांनी त्याच्यावर टीका केली. मात्र, तल्हाने कोणत्याही दबावाखाली न येता सांगितले की कलाकाराला सीमा आणि राजकारणाच्या चौकटीत अडकवून ठेवता येत नाही.तल्हा अंजुमची भारतातही मोठी लोकप्रियता आहे. भारतीय तिरंग्याचा आदर केल्याने भारतातील अनेक चाहते त्याच्या समर्थनात उतरले आहेत. अनेकांनी त्याच्या पोस्टवर कमेंट करून त्याचे कौतुक केले.तल्हाने मागील काही वर्षांत प्रचंड लोकप्रियता मिळवली आहे. 2021 मध्ये ‘गुमान’, ‘अफसाने’ आणि पीएसएलचे अँथम ‘ग्रूव मेरा’ यामुळे त्याला मोठी ओळख मिळाली. 2024 मध्ये त्याने दोन सोलो अल्बम रिलीज केले.

हेही वाचा :
शुभमन गिल आणि गाैतम गंभीर यांच्यात मोठे मतभेद, थेट भारतीय संघाला फटका
११ वर्षांनंतर रेखाचा कमबॅक? बॉलिवूडपासून दूर असूनही ३०० कोटींची संपत्तीची मालकीण!
बिग बॉस फेम शिव ठाकरेच्या घराला भीषण आग, व्हिडीओ व्हायरल