रोडीज आणि बिग बॉस फेम अभिनेता शिव ठाकरे याच्या गोरेगाव येथील निवासस्थानी आग लागल्याची माहिती समोर आली आहे. त्याच्या टीमने दिलेल्या अधिकृत माहितीनुसार, अभिनेता सुरक्षित आहे. आणि त्याला कोणतीही दुखापत झालेली नाही. सोशल मीडियावर त्याच्या घराला लागलेल्या आगीचे(fire) काही व्हिडीओ व्हायरल होत आहेत. या व्हिडीओमधून आगीमुळे शिव ठाकरेच्या घराचं नुकसान झाल्याचं दिसत आहे. आगीचा फटका कोलते पाटील व्हर्वे इमारतीतील त्याच्या निवासस्थानाला बसला असून, या आगीत त्याच्या मालमत्तेचे मोठे नुकसान झाले आहे.या आगीत कुणालाही इजा झाली नाही, मात्र त्याच्या घराचे प्रचंड नुकसान झाले आहे. घरातील फर्निचरसह इतर काही सामान या आगीत जळून नष्ट झाले आहे.

अद्याप या आगीच्या घटनेबद्दल शिव ठाकरेची काही प्रतिक्रिया समोर आलेली नाही. दरम्यान, सोशल मीडियावर शेअर केलेल्या व्हिडिओवर त्यांच्या चाहत्यांनी दु:ख व्यक्त केले आहे.शिव ठाकरे सोशल मीडियावर नेहमीच सक्रीय असतो. तो आपले अनेक फोटो-व्हिडिओ आणि आपल्या कुटुंबाशी संबंधित फोटो-व्हिडिओ नियमितपणे शेअर करताना दिसतो.अशातच, मुंबईतील त्याच्या राहत्या घराला लागलेल्या आगीचे काही व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या व्हिडिओंमुळे चाहत्यांमध्ये मोठा चर्चा रंगली आहे.
सोशल मीडियावर विरल भयानी आणि टेली मसाला या अकाउंटद्वारे आगीचे व्हिडिओ शेअर करण्यात आले आहेत. सुदैवाने, अभिनेता सुरक्षित आहे आणि अग्निशमन दलाने ही आग (fire)आटोक्यात आणली आहे.या घटनेबद्दल त्याच्या टीमनेही एक निवेदन जारी केले आहे. अधिकृत पत्रात त्यांनी म्हटले आहे की, “@shivthakare9 याच्या मुंबईतील कोलते पाटील व्हेर्व इमारतीतील निवासस्थानी आज सकाळी आग लागल्याने एक अपघात झाला. या घटनेत अभिनेत्याला कोणतीही दुखापत झाली नाही, परंतु घराचे सर्वाधिक नुकसान झाले आहे.

हेही वाचा :
वयाच्या अवघ्या 34व्या प्रसिद्ध गायकाचं निधन…
सारा तेंडुलकर पोहोतली बाबा श्री काशी विश्वनाथ मंदिरात, सोज्वळ-सुंदर रूप पाहून चाहते घायाळ
लाडक्या बहिणींना खुशखबर मिळणार, नोव्हेंबरचे ₹१५०० या दिवशी जमा होण्याची शक्यता