ओडिया संगीतसृष्टीतील(singer) लोकप्रिय गायक ह्यूमन सागर यांच्या निधनाची धक्कादायक बातमी समोर आली आहे. केवळ 34 वर्षांच्या तरुण वयात त्यांनी सोमवारी संध्याकाळी अखेरचा श्वास घेतला. गेल्या काही दिवसांपासून ते गंभीर आजाराशी झुंज देत होते. त्यांच्या प्रकृतीने अचानक साथ सोडताच संपूर्ण ओडिया फिल्म व संगीत इंडस्ट्रीवर शोककळा पसरली आहे. लाखो चाहत्यांचा लाडका स्वर एकदम शांत झाल्याने सर्वांना मोठा धक्का बसला आहे.

ह्यूमन सागर यांनी ‘इश्क तू ही तू’ या चित्रपटाच्या टायटल गाण्याने आपली कारकीर्द सुरू केली होती. काही वर्षांतच त्यांनी ओडिया संगीताला नवा चेहरा दिला. त्यांचा आवाज, खोली आणि अनोखी शैली यांच्या जोरावर ते घराघरात पोहोचले. त्यांनी हिंदीमध्येही ‘मेरा ये जहां’ या अल्बमद्वारे आपली छाप सोडली. त्यांच्या अकाली जाण्याने संगीतविश्वात भरून न येणारी पोकळी निर्माण झाली आहे.
ह्यूमन सागर(singer) यांना 14 नोव्हेंबर रोजी गंभीर अवस्थेत AIIMS भुवनेश्वर येथे दाखल करण्यात आले होते. त्यांची तब्येत झपाट्याने बिघडत असल्याने त्यांना तात्काळ मेडिकल ICU मध्ये हलवण्यात आले. डॉक्टरांनी केलेल्या तपासणीत ते अक्यूट-ऑन-क्रोनिक लिव्हर फेल्युअर, बायलेटरल न्यूमोनिया, तसेच डायलटेड कार्डिओमायोपथी यांसारख्या गंभीर आजारांशी झुंज देत असल्याचे स्पष्ट झाले.

कारण त्यांच्या शरीरातील अनेक महत्त्वाचे अवयव काम करणे थांबवू लागले होते. त्यामुळे उपचारांना प्रतिसाद न मिळाल्याने त्यांची प्रकृती आणखी खालावली आणि अखेर 34व्या वर्षी त्यांचे निधन झाले. चिकित्सकांच्या मते त्यांची स्थिती अत्यंत गंभीर होती आणि सर्वतोपरी प्रयत्न करूनही त्यांना वाचवता आले नाही.ह्यूमन सागर यांच्या निधनानंतर त्यांची आई शेफाली सागर यांनी त्यांच्या मॅनेजर आणि काही इव्हेंट आयोजकांवर गंभीर आरोप केले आहेत. त्यांच्या म्हणण्यानुसार, ह्यूमनची तब्येत अत्यंत खराब असतानाही त्यांना सतत परफॉर्म करण्यास भाग पाडले जात होते.
“तो अशक्त होता, चालणंही अवघड झालं होतं… तरीही त्याला जबरदस्तीने स्टेजवर ढकललं जात होतं,” असा गंभीर आरोप त्यांच्या आईने केला आहे. या आरोपानंतर ओडिया संगीतवर्तुळात आणि चाहत्यांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. अनेकांनी याची स्वतंत्रपणे चौकशी करावी, अशी मागणी केली आहे.ह्यूमन सागर यांच्या जाण्याने ओडिया संगीतविश्वाने एक तरुण, प्रतिभावान आणि भावपूर्ण आवाज गमावला आहे. त्यांच्या गाण्यांनी लाखो चाहत्यांच्या मनात कायमची जागा निर्माण केली होती. त्यांच्या अचानक जाण्याने अनेकांच्या डोळ्यात पाणी आले असून सोशल मीडियावर श्रद्धांजली संदेशांचा ओघ सुरू आहे.

हेही वाचा :
सारा तेंडुलकर पोहोतली बाबा श्री काशी विश्वनाथ मंदिरात, सोज्वळ-सुंदर रूप पाहून चाहते घायाळ
लाडक्या बहिणींना खुशखबर मिळणार, नोव्हेंबरचे ₹१५०० या दिवशी जमा होण्याची शक्यता
WPL 2026 च्या मेगा लिलावाची तारीख झाली निश्चित…