लाडकी बहीण(sisters) योजनेच्या केवायसी प्रक्रियेला मिळालेल्या मुदतवाढीमुळे राज्यातील लाखो महिलांना मोठा दिलासा मिळाला असतानाच आता नोव्हेंबरच्या हप्त्याबाबत उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. नोव्हेंबर महिना सुरू होऊन १८ दिवस उलटूनही योजनेचा १५०० रुपयांचा हप्ता जमा न झाल्याने महिलांमध्ये प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून राज्य सरकारकडून लवकरच अधिकृत घोषणा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक कार्यक्रमामुळे आचारसंहिता लागू असल्याने हप्ता जमा होणार की नाही, अशीही चर्चा होती. मात्र, आचारसंहितेच्या कालावधीतही महिलांच्या खात्यात पैसे जमा करण्यात कोणताही अडथळा नसल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. नगरपरिषद आणि नगरपंचायतींच्या निवडणुका २ आणि ३ डिसेंबरला होत असल्याने त्याआधीच हप्ता जमा होण्याची शक्यता वर्तवली जात असून नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यात लाभार्थींना रक्कम मिळू शकते, अशी माहिती सूत्रांकडून समोर आली आहे.

दरम्यान, लाडकी बहीण(sisters) योजनेतील अनिवार्य केवायसीची अंतिम मुदत ३१ डिसेंबर ठरवण्यात आली असून तांत्रिक अडचणी दूर करण्यासाठी पोर्टलमध्ये सुधारणा करण्यात आल्या आहेत. त्यामुळे महिलांना केवायसी करणे आता अधिक सुलभ होणार असून, योजनेचा लाभ मिळवण्यासाठी ही प्रक्रिया वेळेत पूर्ण करण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.

हेही वाचा :

WPL 2026 च्या मेगा लिलावाची तारीख झाली निश्चित…
‘पदं येतात-जातात…पण नातं?’ शिंदेंच्या शिवसेनेत अस्वस्थता? तरुण नेत्याच्या ‘त्या’ पोस्टनं खळबळ
 साडेतीन वर्षीय बालिकेवर अत्याचार करून खून…