WhatsApp आपल्या युजर्ससाठी सतत नवीन सुविधा आणत असून आता iPhone वापरकर्त्यांसाठी एक महत्त्वाचे फीचर उपलब्ध होणार आहे. एकाच फोनमध्ये दोन वेगवेगळे WhatsApp नंबर वापरणाऱ्यांसाठी हे फीचर(features) अतिशय उपयुक्त ठरणार आहे. अँड्रॉइड युजर्सना आधीपासून मिळणाऱ्या मल्टी-अकाउंट सपोर्ट फीचरची WhatsApp आता iOS युजर्ससाठीही तयारी करत आहे.

या फीचरमुळे आयफोन वापरकर्ते एका अ‍ॅपमध्ये दोन WhatsApp अकाउंट सहजपणे वापरू शकतील आणि लॉग आउट न करता एका खात्यातून दुसऱ्या खात्यावर स्विच करू शकतील. प्रत्येक अकाउंटचे चॅट, नोटिफिकेशन आणि प्रायव्हसी सेटिंग्ज स्वतंत्र राहणार असल्याने युजर्सना(features) वेगळा अनुभव मिळेल. WABetaInfo च्या माहितीनुसार, हे फीचर सध्या iOS बीटा व्हर्जन 25.34.10.72 मध्ये चाचणीसाठी उपलब्ध झाले आहे. एकदा मल्टी-अकाउंट फीचर सक्रिय केले की कोणत्या खात्यावर मेसेज आला आहे

याची नोटिफिकेशनद्वारे माहिती मिळणार आहे. तसेच हे फीचर WhatsApp च्या अ‍ॅप लॉक सुविधेलाही सपोर्ट देईल. युजर्स सेटिंग्जमध्ये जाऊन दुसरे खाते कधीही हटवू किंवा पुन्हा जोडू शकतील. सध्या चाचणी टप्प्यात असलेले हे फीचर लवकरच सर्व iOS युजर्ससाठी स्टेबल अपडेट म्हणून रिलीज होण्याची अपेक्षा आहे, मात्र WhatsApp ने अधिकृत तारीख अद्याप जाहीर केलेली नाही. अँड्रॉइडप्रमाणेच आता आयफोन युजर्सही या सुविधेची उत्सुकतेने वाट पाहत आहेत.

हेही वाचा :

संजय पाटील यड्रावकर व राजू शेट्टींच्या पीएमध्ये सभागृहातच खडाजंगी
मोफत रेशन योजनेत मोठी कारवाई..; 2.25 कोटी अपात्र लाभार्थ्यांची वगळली नावे
नागरिकांनो सावधान! १९, २० नोव्हेंबरला राज्यावर मोठं संकट