गेल्या वर्षी 25 नोव्हेंबरला केंद्र सरकारने पॅन 2.0 प्रकल्पाला मंजुरी दिल्यानंतर आता करदात्यांसाठी पॅन कार्डचे डिजिटल अपग्रेड अधिक सुलभ झाले आहे. पॅन 2.0 हे आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित असून त्यात सुरक्षेची उन्नत वैशिष्ट्ये जोडण्यात आली आहेत. आतापर्यंत पॅन(PAN card) सेवांचा वापर तीन वेगळ्या पोर्टलद्वारे होत होता, मात्र नव्या उपक्रमामुळे पॅन बनवणे, दुरुस्ती करणे, आधार लिंक करणे, ई-पॅन डाउनलोड करणे या सर्व सुविधा एकाच डिजिटल प्लॅटफॉर्मवर कागदविरहित पद्धतीने उपलब्ध होणार आहेत.

नवीन पॅन कार्डवर (PAN card)डायनॅमिक QR कोड असेल, ज्यामुळे कार्डधारकाची ओळख आणि तपशीलांची त्वरित पडताळणी शक्य होईल. सर्वात महत्त्वाचे म्हणजे ई-पॅन त्वरित आणि विनामूल्य जारी केला जाईल. जुन्या पॅन कार्डधारकांना नवीन कार्ड घेण्याची गरज नसून ते सहजपणे पॅन 2.0 मध्ये अपग्रेड करू शकतात. अपग्रेड प्रक्रिया NSDL च्या पोर्टलवर PAN, आधार आणि जन्मतारीख भरून OTP पडताळणीद्वारे पूर्ण होते.

पॅन जारी झाल्यानंतर 30 दिवसांच्या आत अपग्रेड केल्यास ही सेवा मोफत मिळते, अन्यथा फक्त 8.26 रुपये शुल्क भरावे लागते. पेमेंटनंतर 30 मिनिटांत ई-पॅन ईमेलवर पाठवला जातो, तर नवीन फिजिकल पॅन कार्ड 15 ते 20 दिवसांत नोंदणीकृत पत्त्यावर पोहोचते. पॅन 2.0 मुळे करदात्यांसाठी डिजिटल व्यवहार अधिक सुरक्षित आणि सोपे होण्याची अपेक्षा आहे.

हेही वाचा :

Rohit Sharma इज बॅक! दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी वनडेचे नेतृत्व ‘हिटमॅन’कडे
अरे जरा तरी लाज बाळगा! एकट्या विदेशी महिलेला पाहून तरुणाचे ‘ते’ अश्लील कृत्य, Video Viral
१५ मिनिटांत अस्सल गावरान पद्धतीमध्ये बनवा चमचमीत टोमॅटो शेव भाजी