दुपारच्या जेवणात प्रामुख्याने चपाती भाजी खाल्ली जाते. पण कायमच चपातीसोबत नेमकी कोणती भाजी बनवावी, हे सुचत नाही. कायमच भेंडी, भोपळा, कोबी, शिमला मिरची इत्यादी भाज्या खाऊन कंटाळा आल्यानंतर काहींना काही नवीन आणि चमचमीत पदार्थ खाण्याची इच्छा होते. अशावेळी तुम्ही सोप्या पद्धतीत टोमॅटो(tomato) शेव भाजी बनवू शकता. गावरान चवीची शेव भाजी चपाती किंवा भाकरीसोबत अतिशय सुंदर लागते.

गावाकडे बनवले जाणारे जेवण अतिशय कमी मसाले आणि साध्या पद्धतीमध्ये बनवले जाते. धावपळीच्या जीवनशैलीमुळे कायमच घरातील काम करताना सगळ्यांची घाई होते. घाईच्या वेळी नेमकं काय बनवावं? हे बऱ्याचदा सुचत नाही. अशावेळी टोमॅटो शेव भाजी अतिशय उत्तम पर्याय आहे. चमचमीत पदार्थ खाण्याची इच्छा झाल्यानंतर कमीत कमी साहित्यात तुम्ही टोमॅटो शेव भाजी बनवू शकता. चला तर जाणून घेऊया टोमॅटो(tomato) शेव भाजी बनवण्याची सोपी रेसिपी.

साहित्य:

टोमॅटो
शेव
मोहरी
हिंग
जिरं
आलं लसूण पेस्ट
हिरवी मिरची
लाल तिखट
हळद
गरम मसाला
कढीपत्ता
गूळ

कृती:

कढईमध्ये तेल गरम करण्यासाठी ठेवा. गरम तेलात मोहरी, जिरं आणि हिंग, कढीपत्ता घालून भाजा. त्यानंतर त्यात बारीक चिरलेला कांदा घालून मंद आचेवर भाजा.त्यानंतर त्यात चवीनुसार मीठ, टोमॅटो घालून झाकण ठेवून शिजवून घ्या. कांदा टोमॅटो व्यवस्थित शिजल्यास पदार्थाची चव अतिशय सुंदर लागते.कांदा शिजल्यानंतर त्यात आलं लसूण पेस्ट, हिरवी मिरची पेस्ट घालून भाजा. नंतर त्यात लाल तिखट, हळद, गरम मसाला घालून मिक्स करा.

मसाल्यांना तेल सुटल्यानंतर त्यात थोडस पाणी आणि चवीनुसार गूळ घालून मिक्स करा. गूळ टाकल्यामुळे पदार्थांची चव आंबट गोड लागते.सगळ्यात शेवटी तयार केलेल्या मिश्रणात बारीक चिरलेली कोथिंबीर घालून व्यवस्थित मिक्स करा. भाजी शिजल्यानंतर त्यात बारीक लाल शेव घालून मिक्स करा.काहीवेळ परतून झाल्यानंतर गॅस बंद करून भाजी सर्व्ह करा. तयार आहे सोप्या पद्धतीमध्ये बनवलेली टोमॅटो शेव भाजी. हा पदार्थ चपाती किंवा भाकरीसोबत खाऊ शकता.

हेही वाचा :

तुमच्या भेटीला येत आहे नवीन आधार कार्ड; अधिक सुरक्षित, गोपनीय अन् आधुनिक
बछड्यावर हात उचलताच सिंहीणी रागातच उठली, थेट जंगलाच्या राजालाच मारली थप्पड; मजेदार Video Viral
एकाच फोनमध्ये 2-3 WhatsApp अकाऊंट चालवता येणार?