हिवाळ्यात मनी प्लांट (Money plant)हिरवा आणि निरोगी ठेवण्यासाठी काही सोप्या टिप्स अत्यंत उपयुक्त ठरतात. तज्ज्ञांच्या मते, सर्वात महत्त्वाची चूक म्हणजे झाडाला जास्त पाणी देणे. माती पूर्णपणे कोरडी असेल तेव्हाच पाणी द्यावे, अन्यथा मुळे सडण्याचा धोका वाढतो आणि पाने पिवळी पडतात. तसेच मनी प्लांटला प्रकाश आवडतो, पण थेट तेजस्वी सूर्यप्रकाश टाळावा अप्रत्यक्ष प्रकाश मिळणाऱ्या जागी झाड ठेवणे योग्य असते.

झाडाच्या खालच्या पानांची आणि मातीची स्वच्छता राखणे देखील आवश्यक आहे, कारण दाट पाने मातीचे प्रकाश व हवा यास प्रतिबंध करतात. कुंडीच्या तळाशी छिद्र योग्य असल्याची खात्री करणे गरजेचे आहे, जेणेकरून अतिरिक्त पाणी त्वरित बाहेर पडेल आणि मुळे सडण्याचा धोका कमी होईल.
हिवाळ्यात मनी प्लांटसाठी(Money plant) घरगुती खतांचा वापर फायदेशीर ठरतो. चहाच्या पानांचे कंपोस्ट किंवा अर्धा लिटर पाण्यात मिसळलेली कॉफी पावडर महिन्यातून एकदाच मातीमध्ये घालावी. या सोप्या उपायांमुळे फक्त 2 रुपयांत मनी प्लांटसाठी प्रभावी खत मिळते आणि झाड निरोगी, हिरवे व तंदुरुस्त राहते.

हेही वाचा :
ऐश्वर्या रायच्या ‘त्या’ कृत्याने जया बच्चन यांना मोठा धक्का..
वर्ल्डकप स्पर्धेचं वेळापत्रक आयसीसीने केलं जाहीर…
दयाबेनचा लवकरच होणार तारक मेहतामध्ये कमबॅक, टपूने स्वतःच दिली माहिती