आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेतर्फे जाहीर केलेल्या 2026 अंडर-19 मेन्स वनडे वर्ल्डकप स्पर्धेच्या वेळापत्रकानुसार, ही स्पर्धा 15 जानेवारीपासून सुरु होऊन 6 फेब्रुवारीपर्यंत (schedule)चालणार आहे. या स्पर्धेत एकूण 16 संघ सहभागी असतील आणि त्यांना चार गटांमध्ये विभागण्यात आले आहे. ICC ने आश्चर्यकारक निर्णय घेतला आहे की भारत-पाकिस्तान सामना या स्पर्धेत प्रारंभिक साखळी फेरीत न होण्याचे ठरले आहे; दोन्ही संघांना वेगळ्या गटात ठेवण्यात आले आहे, त्यामुळे ते फक्त बाद फेरीतच आमनेसामने येऊ शकतात.

गट अ मध्ये भारतासोबत न्यूझीलंड, बांग्लादेश आणि अमेरिका आहेत, आणि भारताचा पहिला सामना अमेरिकेशी झिम्बाब्वेतील बुलावायोत होणार आहे. गट ब मध्ये सह-यजमान झिम्बाब्वे, पाकिस्तान, इंग्लंड आणि स्कॉटलंडचा समावेश आहे. गतविजेता ऑस्ट्रेलिया, आयर्लंड, जपान आणि श्रीलंका गट क मध्ये असून, गट ड मध्ये टांझानिया, वेस्ट इंडिज, अफगाणिस्तान आणि दक्षिण आफ्रिका आहेत.
ICC अध्यक्ष जय शाह यांनी सांगितले की, ही स्पर्धा फक्त पुढील पिढीतील क्रिकेटपटूंना नव्हे तर भविष्यातील आंतरराष्ट्रीय आयकॉनसुद्धा समोर आणेल. त्यांनी नमूद केले की, अंडर-19 विश्वचषकाने ब्रायन लारा, सनथ जयसूर्या, विराट कोहली, केन विल्यमसन, स्टीव्ह स्मिथ आणि शुबमन गिलसारख्या ताऱ्यांचे भविष्य (schedule)घडवले आहे आणि या स्पर्धेतही भविष्यातील क्रिकेट तारे दिसतील.

हेही वाचा :
रोमँटिक फोटोसाठी हार्दिक पंड्याची नवी शक्कल! महिका शर्माला मांडीवर घेत केला किस
आईनेच 9 महिन्यांच्या लेकीची गळा दाबून केली हत्या
लेकाने पवारांना चॅलेंज केल्यानंतर BJP नेत्याची बिनशर्त माफी…