बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री (actress)ऐश्वर्या राय बच्चन ही गेल्या काही आठवड्यांपासून खासगी आयुष्यामुळे सतत चर्चेत आहे. अभिषेक बच्चनआणि ऐश्वर्या राय यांच्या नात्यात दुरावा निर्माण झाल्याच्या चर्चा एंटरटेनमेंट वर्तुळात मोठ्या प्रमाणावर रंगताना दिसत आहेत. बच्चन कुटुंबाकडून मात्र या चर्चांवर कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही. पण या मौनाच्या दरम्यान ऐश्वर्याने घेतलेल्या एका निर्णयामुळे पुन्हा एकदा सर्वांचे लक्ष तिच्याकडे वेधले गेले आहे. पहिल्यांदाच ती थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सोबत एका मंचावर दिसली असून, यावरूनही नव्या चर्चांचा भडिमार सुरू आहे.

पुट्टपार्थी येथे दिवंगत आध्यात्मिक गुरू सत्य साई बाबा यांचे शताब्दी वर्ष साजरे करण्यासाठी भव्य सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. बुधवारी या सोहळ्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आंध्र प्रदेशात पोहोचले. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू, माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर आणि अनेक मान्यवर उपस्थित होते. त्याच मंचावर ऐश्वर्या रायची उपस्थिती विशेष ठरली. ऐश्वर्या राय यापूर्वी कधीही नरेंद्र मोदींसोबत एका व्यासपीठावर दिसली नव्हती. त्यामुळे तिच्या या हालचालीमुळे नवे राजकीय आणि कौटुंबिक अर्थ काढले जात आहेत.
ऐश्वर्या राय ही सत्य साई बाबांची जुनी भक्त मानली जाते. तिचे आईवडीलही सत्य साई बाबांचे निष्ठावंत अनुयायी होते. 1991 मध्ये ऐश्वर्या रायने मिस वर्ल्ड किताब जिंकल्यानंतर तिने बाबांच्या चरणी जाऊन आशीर्वाद घेतले होते. तिच्या आयुष्यात निर्णय घेण्याच्या टप्प्यावर अनेकदा तिने सत्य साई बाबांची मार्गदर्शन घेतल्याचे म्हटले जाते. अभिषेक बच्चनसोबत विवाहाचा निर्णय घेतानाही तिने सत्य साई बाबांचा सल्ला घेतल्याची माहिती समोर आली होती. त्यामुळे त्यांच्या शताब्दी कार्यक्रमाला हजेरी लावण्यासाठी ऐश्वर्या विशेषतः आंध्र प्रदेशात पोहोचली होती.
कार्यक्रमादरम्यान ऐश्वर्या रायने(actress) भावूक होत सत्य साई बाबांसोबत असलेले तिचे नाते आणि तिच्या आयुष्यातील त्यांचे स्थान याबद्दल मनोगत व्यक्त केले. तिच्या बोलण्यातून आध्यात्मिक श्रद्धा किती घट्ट रुजलेली आहे, हे प्रकट झाले. ऐश्वर्याच्या या सहभागामुळे तिच्या सध्याच्या वैयक्तिक आणि कौटुंबिक परिस्थितीबाबतही नवे प्रश्न उपस्थित होत आहेत.
जया बच्चन या समाजवादी पार्टीच्या खासदार असून त्या अनेकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपावर कठोर टीका करताना दिसतात. राजकीय विचारसरणीच्या दृष्टीने बच्चन कुटुंबात स्पष्ट भेद असल्याचे गेल्या काही वर्षांत अनेकदा दिसून आले. अशा परिस्थितीत ऐश्वर्या रायची नरेंद्र मोदींसोबत एकाच मंचावर उपस्थिती ही अनेकांसाठी आश्चर्याची बाब ठरली. सोशल मीडियावर तर “ऐश्वर्याने जया बच्चनांना मोठा धक्का दिला का?” असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
कार्यक्रमादरम्यान ऐश्वर्या राय पंतप्रधानांच्या समोर भाषण करताना दिसली आणि तिच्या भावूक अभिव्यक्तींनी उपस्थित प्रेक्षकांचे लक्ष वेधले. बच्चन कुटुंब आणि त्यांच्या सध्याच्या कौटुंबिक चर्चांच्या पार्श्वभूमीवर ऐश्वर्याचा हा निर्णय अनेकांना राजकीय संकेत देणारा वाटत आहे. तिच्या या हालचालीमुळे अभिषेक बच्चनसोबतचे नाते, कौटुंबिक समीकरणे आणि बच्चन कुटुंबातील वातावरणाबद्दल नव्या चर्चा रंगू लागल्या आहेत.

हेही वाचा :
रोमँटिक फोटोसाठी हार्दिक पंड्याची नवी शक्कल! महिका शर्माला मांडीवर घेत केला किस
आईनेच 9 महिन्यांच्या लेकीची गळा दाबून केली हत्या
लेकाने पवारांना चॅलेंज केल्यानंतर BJP नेत्याची बिनशर्त माफी…