सोशल मीडियावर(social media) रोज काही ना काही व्हायरल होत असते. कधी मजेशीर, तर कधी चित्र-विचित्र व्हिडिओ पाहायला मिळतात. काही व्हिडिओ इतके मजेशीर असतात की हसून हसून पोट दुखून येते तर काही व्हिडिओ अगदी किळसवाणे असतात. सध्या सोशल मीडियावर एक जबरदस्त व्हिडिओ व्हायरल होत आहे. एका बॉलीवूड गाण्यावर काही परदेशींनी जबरदस्त ठेका धरला आहे. यावरुन लक्षात येते की आपल्या बॉलीवूड गाण्यांची क्रेझ परदेशींमध्ये देखील आहे.
व्हायरल व्हिडिओत नेमकं काय?

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एका पेट्रोल पंपावरचे दृश्य दिसत आहे. येथे एक ट्रॅक्टर डिझेल भरण्यासाठी आला आहे. ट्रॅक्टवर हिंदी चित्रपटांती गाणी वाजत आहेत. यावर अचानक सलमान खानच्या चित्रपटातील चुनरी-चुनरी गाणे वाजू लागते. यावेळी पेट्रोल पंपावर काही परदेशी महिला आणि पुरुषही असतात. चुनरी-चुनरी गाणं वाजताच परदेशींनी ठेका धरला आहे. त्यांच्यासोबतच पेट्रोल पंपावरचे काही लोक आणि ट्रक्टर चालकाने देखील ठुमका मारताना दिसत आहेत. सर्वजण आनंदाने मस्त असा ठेका धरताना दिसत आहेत. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

व्हायरल होत असलेला व्हिडिओ अनेक सोशल मीडिया(social media) प्लॅटफॉर्म्सवर व्हायरल होत आहे. या व्हिडिओला आतापर्यंत हजारो लाईक्स आणि व्ह्यूज मिळाले आहेत. यावर अनेकांनी हार्ट इमोजी शेअर केले आहेत. एका नेटकऱ्याने म्हटले आहे की, सो कूल मजा आ गया, मजा आ गया, तर दुसऱ्या नेटकऱ्याने याला म्हणतात खरा एन्जॉय असे म्हटले आहे. आणखी एकाने काय ठेका धरलाय? जबरदस्त असे म्हटले आहे. सध्या हा व्हिडिओ भारतीयांच्या पसंतीस पडत आहे.

हेही वाचा :

ऐश्वर्या रायच्या ‘त्या’ कृत्याने जया बच्चन यांना मोठा धक्का..
वर्ल्डकप स्पर्धेचं वेळापत्रक आयसीसीने केलं जाहीर…
दयाबेनचा लवकरच होणार तारक मेहतामध्ये कमबॅक, टपूने स्वतःच दिली माहिती