लग्न हे दोन जिवांच मिलन मानलं जातं. लग्नावेळी गंमत-जंमत, डान्स, गडबड-गोंधळ होणे काही मोठी गोष्ट नाही पण उत्तर प्रदेशाच्या या लग्नात(marriage) मात्र एक वेगळाच ड्रामा पाहायला मिळाला. यात वर-वधू लग्नासाठी सज्ज झाले खरे पण घडलं काही भलतंच आणि क्षणातच एंट्री झाली वराच्या पहिल्या बायकोची… होय तुम्ही बरोबर ऐकलंत. आनंदाच्या या समारंभात अचानक गोंधळ निर्माण झाला आणि लग्नमंडपातच सुरु झाला हाय व्होल्टेज ड्रामा. वराच्या पत्नीने सर्वांसमोर अशा गोष्टी उघड केल्या की पाहून सर्वच थबकले. चला व्हिडिओत नक्की काय घडलं ते सविस्तर जाणून घेऊया.

उत्तर प्रदेशातील बस्ती जिल्ह्यातील एका लग्नात नाट्यमय प्रकार घडला. लग्न सुरु असतानाच अचानक वराच्या बायकोची एंट्री होते जी सर्वांसाठीच एक आश्चर्यकारक सरप्राईज ठरते. एवढंच काय तर पतीचा खोटेपणा उघड करण्यासाठी ती सोबत पुरावे देखील घेऊन आलेली असते. व्हिडिओमध्ये पत्नी सर्वांना काही फोटो दाखवून तिची बाजू पटवण्याचा प्रयत्न करते. ती म्हणते की, “माझ्याकडे कायदेशीर पुरावे आहेत, याच मुलाने माझ्याशी लग्न केले होते आणि आता तो पुन्हा लग्न करत आहे.” तिने हे देखील उघड केले की त्यांनी आधी कोर्ट मॅरेज केले आणि नंतर कुटुंबाच्या उपस्थितीत एक भव्य लग्न केले. दुसऱ्या व्हिडिओमध्ये ती थेट विनयला विचारते, “आपला घटस्फोट झाला का? सर्वांसमोर सांगा.” ती गर्दी थांबवते आणि म्हणते, “कोणीही हस्तक्षेप करणार नाही.”
पत्नीच्या म्हणण्यानुसार, ती आणि तिचा नवरा नऊ वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये होते. त्यांनी ३० मार्च २०२२ रोजी कोर्ट मॅरेज केले आणि ८ डिसेंबर २०२२ रोजी ते लग्नबंधनात अडकले गेले. नंतर(marriage) दोघांमधील वाद वाढले आणि कायदेशीर कारवाई सुरू झाली. घटस्फोट अद्याप निश्चित झाला नव्हता, म्हणून ती दुसरे लग्न थांबवण्यासाठी गुजरातमधील अंकलेश्वर येथून आली होती. पोलिसांनी परिस्थितीवर नियंत्रण मिळवले आणि दोन्ही पक्षांना चौकशीसाठी पोलिस ठाण्यात नेले. पोलिसांनी हे स्पष्ट केलं की घटस्फोटाशिवाय पुनर्विवाह करणे बेकायदेशीर आहे आणि चौकशीनंतर पुढील कारवाई केली जाईल.
हेही वाचा :
५० मेगापिक्सेल सेल्फी कॅमेरा असलेला एक जबरदस्त स्मार्टफोन लाँच…
महापालिका निवडणुकीत मनसे व ठाकरे गटाची युती निश्चित…
घरीच आता बनवा ‘थिएटर’, आवाज वाढताच वाटेल Disco Club…