मुंबई महानगरपालिका निवडणुकीपूर्वी राज्यातील राजकारणात(politics) मोठे बदल होत आहेत. शिवसेना (ठाकरे गट) आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांच्यातील संभाव्य युतीबाबत चर्चा आता शिगेला पोहोचली आहे. या दोन्ही पक्षांमध्ये जागावाटपाचा फॉर्म्युला जवळपास ठरल्याची माहिती समोर आली असून, युतीचे चित्र आता अधिक स्पष्ट होत आहे. त्यामुळे मुंबई महापालिकेतील राजकीय समीकरणे नव्यानं बदलण्याची चिन्हे दिसत आहेत.ठाकरे गटाने मनसेला तब्बल ७० जागांचा प्रस्ताव दिल्याची माहिती मिळाली आहे. जर मनसेने हा प्रस्ताव स्वीकारला तर शिवसेना (ठाकरे गट) आणि मनसे एकत्र Mumbai BMC निवडणूक लढवण्याची शक्यता प्रबळ झाली आहे. या युतीचा थेट परिणाम भाजप आणि शिंदे गटाच्या समीकरणावर होणार असल्याचे राजकीय तज्ज्ञांचे मत आहे.

मनसे नेते अमित ठाकरे यांच्या विधानामुळे या संभाव्य युतीच्या चर्चांना अधिक बळ मिळाले आहे. ठाकरे बंधू पुन्हा एकत्र येण्याच्या भीतीवर विचारण्यात आलेल्या प्रश्नावर त्यांनी स्पष्टपणे उत्तर देत, “दोन्ही ठाकरे एकत्र येण्याची भीती मुंबई महापालिकेत दिसेल,” असे सांगितले. त्यांच्या या वक्तव्याने युती जवळजवळ निश्चित असल्याचा संकेत मिळत असल्याचे बोलले जात आहे.ही युती जर प्रत्यक्षात आली तर आगामी निवडणुकीत मोठा राजकीय भूकंप घडू शकतो. विशेषतः मराठी मतांचे ध्रुवीकरण होण्याची शक्यता वाढेल. गेल्या काही दिवसांपासून मुंबई महापालिकेच्या पार्श्वभूमीवर शिवसेना (ठाकरे गट) – मनसे यांची वाढती जवळीक राजकीय पटलावर चर्चेचा विषय बनली आहे.
मुंबई महापालिका देशातील सर्वात श्रीमंत महापालिका मानली जाते. गेल्या दोन दशकांहून अधिक काळ या महापालिकेवर शिवसेनेची सत्ता आहे. मात्र अलीकडील राजकीय(politics) घडामोडींमुळे शिवसेनेत पडलेल्या फुटीचा मोठा परिणाम या निवडणुकीवर होणार आहे. त्यामुळे ठाकरे गट आणि मनसे एकत्र येऊन पुन्हा एकदा मराठी मतांना एकत्र करण्याचा प्रयत्न करतील, असे निरीक्षकांचे म्हणणे आहे.युती झाली तर भाजप–शिंदे गटाच्या महायुतीवर मोठा दबाव येऊ शकतो. भाजपने मुंबईत सत्ता मिळवण्यासाठी मोठी मोहीम हाती घेतली आहे. महायुतीतील शिंदे गट हा त्यांचा प्रमुख आधार मानला जात होता. पण आता दोन्ही ठाकरे एकत्र आल्यास महायुतीला आपली रणनीती बदलावी लागणार हे निश्चित आहे. त्यामुळे मुंबईत ठाकरे गट + मनसे विरुद्ध महायुती अशी थेट लढत होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
तसेच मुंबई महापालिका, महाराष्ट्रातील 246 नगरपालिका आणि 42 नगरपंचायतींच्या निवडणुकांसाठी 2 डिसेंबरला मतदान तर 3 डिसेंबरला मतमोजणी होणार आहे. या काही दिवसांत पक्षांमधील आघाड्यांबाबतचा अंतिम निर्णय घेतला जाईल. ठाकरे–मनसे युती झाली तर मुंबईतील निवडणूक चित्र पूर्णपणे बदलण्याची शक्यता आहे.
हेही वाचा :
घरीच आता बनवा ‘थिएटर’, आवाज वाढताच वाटेल Disco Club…
शुबमन गिल टीमचा कॅप्टन, तो फिट झाला तरी त्याला गुवाहाटी टेस्टमध्ये खेळवणार नाही
टॉमेटोने वाढवला सर्वसामान्यांच्या किचनचा बजेट…