गेल्या आठवड्यांपासून बाजारात टोमॅटोचे(Tomato) भाव झपाट्याने वर गेले आहेत. आधी स्वस्त असलेले टॉमेटो आता घरगुती बजेटला चॅलेंज देत आहे. गेल्या 15 दिवसात 112 टक्क्यांनी टोमॅटोचे दर वाढले आहेत. बाजारात टॉमेटो किती रुपये किलोने मिळतोय? अचानक का वाढलेयत टोमॅटोचे दर? याबद्दल सविस्तर जाणून घेऊया.हवामानातील बदल आणि मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांचे उत्पादन बाधित झाले, ज्यामुळे टोमॅटोचा पुरवठा घटला आणि भाव दुप्पट झाले. महाराष्ट्र, कर्नाटकसारख्या राज्यांतून दिल्लीपर्यंत सर्वत्र ही समस्या दिसून येतेय. लग्नसराई आणि सणांच्या हंगामात मागणी वाढल्याने परिस्थिती आणखी गुंतागुंतीची झालीय.

ग्राहक व्यवहार मंत्रालयाच्या नोंदींनुसार, 19 ऑक्टोबर ते 19 नोव्हेंबर या काळात देशभर टोमॅटोचे सरासरी भाव 36 रुपयांवरून 46 रुपयांपर्यंत उंचावले. चंदीगडमध्ये 112 टक्के तर कर्नाटक, हिमाचल आणि आंध्रमध्ये 40 टक्क्यांहून अधिक वाढ झाली. काही बाजारात चांगल्या गुणवत्तेचे टोमॅटो(Tomato) 80 रुपयांपर्यंत पोहोचले, ज्यामुळे सामान्य कुटुंबांच्या किचन बजेटवर परिणाम होत असून त्यांना छोट्या प्रमाणात खरेदी करावी लागतेय.पावसामुळे शेतजमिनींचे नुकसान झाले. ज्यामुळे महाराष्ट्र, गुजरात आणि कर्नाटकमधील पिकांचे मोठे नुकसान झाले. दिल्लीच्या आझादपूर मंडीत येणाऱ्या ट्रकची संख्या अर्ध्यावर आली. हवामानातील अनियमिततेमुळे वाहतूकही विस्कळीत झाली. ज्याचा थेट फटका ग्राहकांना बसलाय. शेतकरीही आपल्या उत्पन्नाच्या चिंतेत असल्याचे देशभरात दिसून येतंय.

सण-लग्नांच्या मोठ्या हंगामात टोमॅटोची मागणी दुप्पट झाली. प्रत्येक घरात सॅलड, भाज्या, चटणीसाठी हे आवश्यक असते, पण आता लोक फक्त गरजेनुसार घेत आहेत. यामुळे बाजारातील दबाव वाढला आणि भाव आणखी चढले.मागील महिन्यात टोमॅटो, कांदा, बटाट्याच्या घसरणीमुळे महागाई 0.25 टक्क्यांवर खाली आली होती, जी 2013 नंतरची नीचांक आहे. पण आता पुरवठा कमी झाल्याने महागाई पुन्हा सरकू लागली. यामुळे सामान्य लोकांच्या दैनंदिन खर्चावर परिणाम होईल आणि काही आठवडे टिकू शकते.

हवामान सुधारल्यास पुरवठा लवकर सामान्य होईल पण त्यासाठी वेळ लागेल असं दिसतंय. सरकार बाजारावर नजर ठेवत असून गरज पडल्यास साठवणूक किंवा आयात करू शकते. टोमॅटोला वैकल्पिक भाज्या वापरा आणि बाजारातील बदलांवर लक्ष द्या. लवकरच परिस्थिती बरी होईल, असा सल्ला तज्ञांनी दिलाय.

हेही वाचा :

रोज रात्री लवंग खाऊन झोपल्यास काय होते…
Vivo चे दोन प्रिमियम 5G मोबाईल्सची किंमत आली समोर
सोन्याचे भाव पुन्हा घसरले! 10 ग्रॅमसाठी किती रुपये मोजावे लागणार?