दिवाळीनंतर लग्नसराईची धामधूम सुरू होताच सोन्याच्या (Gold)बाजारातही चढ-उतारांचे सत्र पाहायला मिळते. गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या भावात मोठी तेजी अनुभवली जात होती. मात्र आता या दरांत थोडीशी मुभा मिळत असल्याचे दिसत आहे. गुरुवार, 20 नोव्हेंबर रोजी सोन्यात किरकोळ घसरण नोंदवली गेली असून ग्राहकांना काहीसा दिलासा मिळाला आहे.

दिल्लीमध्ये 24 कॅरेट सोन्याची किंमत 1,25,020 रुपये प्रति 10 ग्रॅम झाली आहे, तर 22 कॅरेटचा भाव 1,14,800 रुपये आहे. मुंबई, चेन्नई आणि कोलकाता या प्रमुख शहरांमध्येही सोन्याच्या दरांत घट झाली असून 22 कॅरेट सोन्याचा भाव 1,14,640 रुपये आणि 24 कॅरेटचा भाव 1,24,870 रुपये प्रति 10 ग्रॅम इतका आहे. पुणे आणि बेंगळुरूमध्ये देखील याच दरांचा समावेश आहे.

कालच 22 कॅरेट सोन्याचा(Gold) भाव 1,25,800 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहोचला होता, परंतु आज तो 1,24,870 रुपयांवर आला आहे. जागतिक बाजारात सोन्याचा स्पॉट प्राइस 4,114.01 डॉलर प्रति औंस नोंदवला गेला असून आंतरराष्ट्रीय घडामोडी, डॉलरची कमजोरी आणि बाजारातील मागणी-पुरवठा हे घटक देशातील सोन्याच्या भावांवर थेट परिणाम करत आहेत.

सोन्यासोबतच चांदीत मात्र तेजी कायम असून चांदीचा दर 1,68,100 रुपये प्रति किलोवर पोहोचला आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात चांदीचा स्पॉट भाव 52.26 डॉलर प्रति औंस आहे. लग्नाचा हंगाम सुरू असताना सोन्याच्या दरातील ही सौम्य घसरण ग्राहकांसाठी थोडासा दिलासा देणारी ठरली आहे.

हेही वाचा :

BSNL युजर्सना झटका, ‘या’ स्वस्त प्लॅनची वैधता कमी केली…
मुलांचे मानसिक आरोग्य बळकट करण्यासाठी ‘हे’ ५ महत्त्वाचे उपाय नक्की करा!
जगातील सर्वात मोठ्या S*x स्कँडलची A To Z माहिती येणार समोर…