इंग्लंडविरुद्ध लॉर्ड्स टेस्टमध्ये झालेल्या निसटत्या पराभवाने भारतीय संघाला मोठा धक्का बसला आहे. पाच सामन्यांच्या मालिकेत भारताला 2-1 अशी आघाडी मिळवण्याची मोठी संधी होती, पण सामना हातातून गेला. या पराभवानंतर भारताचे माजी क्रिकेटपटू मदन लाल यांनी विराट कोहलीला(Virat Kohli) पुन्हा टेस्ट क्रिकेटमध्ये परत येण्याचं आवाहन केलं आहे. कोहलीने या मालिकेआधीच टेस्ट क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली होती. पण मदन लाल यांच्या मते, कोहलीला पुन्हा मैदानात उतरण्यात काहीच गैर नाही.

“विराट कोहलीचं(Virat Kohli) भारतीय क्रिकेटसाठी असलेलं प्रेम आणि त्याची निष्ठा अद्वितीय आहे. माझी इच्छा आहे की त्याने टेस्ट क्रिकेटमध्ये परत यावं. यात काहीही चुकीचं नाही. या मालिकेत नाही, तरी पुढच्या मालिकेत तरी तो परत यावा.” असं मदन लाल यांनी CricketPredicta ला सांगितलं. “त्याने 1-2 वर्षं सहज खेळू शकतो. त्याचा अनुभव नव्या खेळाडूंना मिळणं फार गरजेचं आहे. त्याने फक्त अचानकच टेस्ट क्रिकेट सोडलं. अजून फार उशीर झालेला नाही. कृपया परत ये.” असेही ते म्हणाले.
या सामन्याबद्दल बोलताना इंग्लंडचे माजी कर्णधार मायकल वॉन यांनीही काही मुद्दे मांडले. त्यांच्या मते, शुभमन गिलला लॉर्ड्सच्या दुसऱ्या डावात खेळताना नेहमीसारखी स्थिरता आणि तांत्रिक बारकावे दाखवता आले नाहीत. “तिसऱ्या दिवशी जेव्हा सामना रंगत गेला, तेव्हा इंग्लंडच्या खेळाडूंनी आपला सर्वोत्तम खेळ दाखवला. शुभमन गिल सामान्यतः फारच तांत्रिकदृष्ट्या सक्षम असतो, पण या डावात तो थोडा अस्वस्थ दिसला,” असं वॉन यांनी ‘The Telegraph’ मध्ये लिहिलं.

गिलने मालिकेत सुरुवातीला हेडिंगले येथे शतक झळकावलं होतं आणि नंतर बर्मिंगहॅममध्ये शतक आणि द्विशतक करत अनेक विक्रम मोडले होते. मात्र, लॉर्ड्स टेस्टमध्ये गिल फक्त 16 आणि 6 धावा करू शकला. लॉर्ड्स टेस्टच्या शेवटच्या दिवशी रवींद्र जडेजा आणि खालच्या फळीच्या फलंदाजांनी जोरदार प्रतिकार केला, पण शेवटी भारताला 22 धावांनी पराभव स्वीकारावा लागला. या पराभवानंतर विराट कोहलीच्या पुनरागमनावर चर्चा पुन्हा सुरु झाली आहे.
हेही वाचा :
लोकप्रिय 7 खाद्यपदार्थ परदेशात पूर्णपणे ‘बॅन’; खाल्ले तर थेट शिक्षीच, कारण वाचून आश्चर्य वाटेल
जगातील सर्वात महागडी क्रिकेट जर्सी! सोन्याने केली डिझाइन; किंमत ऐकून थक्क व्हाल
रेल्वे तिकीट बुकिंगच्या नियमांत सर्वात मोठा बदल! तात्काळ बुकिंगसाठी ‘ही’ गोष्ट अनिवार्य