थंडी सुरू होताच हृदयावर ताण येण्याची शक्यता वाढते आणि हृदयरोग असलेल्या रुग्णांसाठी ही काळजीची बाब आहे. वृद्ध, डायबिटीज किंवा उच्च रक्तदाब असलेले लोक हिवाळ्यात हार्ट अटॅकच्या(heart attack) धोका अधिक असतो. थंडीत छातीत दुखणे, जडपणा, डाव्या हातात, खांद्यात किंवा पाठीत पसरणारा वेदना, श्वास घेण्यात त्रास, सतत धाप लागणे, हलके चक्कर येणे, थकवा आणि घाम येणे ही हृदयाशी संबंधित लक्षणे मानली जातात. काहींना जबडा किंवा मान दुखणेही जाणवते, पण लोक बहुतेक वेळा ही लक्षणे गॅस, थकवा किंवा सामान्य अशक्तपणाचे मानून दुर्लक्ष करतात. त्यामुळे थंडीत ही लक्षणे दिसल्यास तात्काळ डॉक्टरांचा सल्ला घेणे गरजेचे असते.

हिवाळ्यात हार्ट अटॅक(heart attack) वाढण्याची मुख्य कारणे चार आहेत – रक्तवाहिन्यांचे आकुंचन होणे, ज्यामुळे रक्तदाब वाढतो; रक्त घट्ट होणे, ज्यामुळे गुठळ्या होण्याची शक्यता वाढते; शरीराला गरम ठेवण्यासाठी हृदयाला जास्त ऑक्सिजनची आवश्यकता भासणे; आणि अचानक मेहनत किंवा व्यायाम केल्यास हृदयावर अनपेक्षित ताण पडणे.

बचावासाठी शरीर गरम ठेवा, थंड वातावरणात अचानक जाण्याचे टाळा, रक्तदाब, साखर आणि कोलेस्ट्रॉल नियमित तपासून घ्या, वॉर्म-अपशिवाय जोरदार काम किंवा व्यायाम करू नका, धूम्रपान सोडा आणि निरोगी आहार घ्या. छातीत दुखणे, श्वास लागणे किंवा अत्यधिक थकवा जाणवल्यास तात्काळ डॉक्टरांचा सल्ला घ्या, कारण वेळीच ओळख आणि उपचाराने हार्ट अटॅकचा धोका कमी करता येतो.

हेही वाचा :

सामना सुरु असतानाच 5.7 तीव्रतेचा भूकंप; भर मैदानात जाणवले धक्के
चिमुरडीच्या हत्येने अख्खं शहर हादरलं… मालेगाव बंद, मोर्चातून उसळला संताप
तलवारीने सपासप वार… काँग्रेस नेत्याचा जागीच मृत्यू… 2 जण गंभीर जखमी…