ढाका येथे बांग्लादेश आणि आयर्लंड यांच्यात सुरू असलेल्या दुसऱ्या टेस्ट सामन्यात(match) एक अनोखा प्रसंग समोर आला. शुक्रवारी सकाळी राजधानी ढाक्यात 5.7 तीव्रतेचा भूकंप जाणवला आणि त्याचा थेट परिणाम क्रिकेट सामन्यावर झाला. मैदानावरील खेळाडूंना अचानक हलके-तीव्र कंप जाणवताच त्यांनी तात्काळ मैदानातच खाली बसून सुरक्षितता घेतली. परिस्थिती लक्षात घेऊन अंपायरांनी काही काळ खेळ थांबवण्याचा निर्णय घेतला.

भूकंपाचे केंद्र बांग्लादेशातील नरसिंगडी परिसरात असल्याची माहिती मिळाली. भूकंप अंदाजे सकाळी 10.08 वाजता झाला, तेव्हा दिवसाचा खेळ नुकताच सुरू झाला होता. आयर्लंडची दुसरी डावातील खेळी सुरू होती आणि संघाने 55 ओव्हरमध्ये 5 बाद 165 धावा केल्या होत्या. अचानक जाणवलेल्या कंपनंतर बाउंड्रीजवळ उभे असलेले खेळाडूही मधल्या भागाकडे धावले.

सोशल मीडियावर या घटनेचे व्हिडीओ वेगाने व्हायरल झाले आहेत. उघड्यावरचे मैदान असल्याने मोठ्या नुकसानाची शक्यता नव्हती, परंतु सावधगिरीचा उपाय म्हणून सर्व खेळाडूंना(match) मैदानात खाली बसून थांबावे लागले. ड्रेसिंग रुममधील खेळाडूही सुरक्षिततेसाठी खाली आले.क्रिकेट आयर्लंडने एक्स (ट्विटर) वर पोस्ट करून माहिती दिली की, “हलके भूकंपाचे धक्के जाणवल्याने खेळ तात्पुरता थांबवण्यात आला आहे.”

कंप साधारण 30 सेकंद जाणवले, त्यानंतर परिस्थिती स्थिर झाल्यावर सामना पुन्हा सुरू करण्यात आला. सुदैवाने मैदानावर कोणत्याही प्रकारचे नुकसान झाले नाही.याआधीही 2022 मध्ये झिम्बाब्वे–आयर्लंड अंडर-19 सामन्यादरम्यान अशाच कारणामुळे खेळ थांबवावा लागला होता.ताज्या स्थितीनुसार, दोन सामन्यांच्या टेस्ट मालिकेत बांग्लादेशने 1-0 अशी आघाडी घेतली आहे. दुसऱ्या टेस्टच्या पहिल्या डावात बांग्लादेशने 476 धावा उभारल्या आहेत. दरम्यान, आयर्लंडने दुसऱ्या डावात 8 बाद 254 धावा करताना बांग्लादेश 222 धावांनी आघाडीवर आहे.

हेही वाचा :

चिमुरडीच्या हत्येने अख्खं शहर हादरलं… मालेगाव बंद, मोर्चातून उसळला संताप
तलवारीने सपासप वार… काँग्रेस नेत्याचा जागीच मृत्यू… 2 जण गंभीर जखमी… 
गरम पाण्यात मिठ टाकून पाय बुडवून बसल्यास कोणते आजार बरे होतात?