भारतीय महिला क्रिकेट (cricket)संघाची उपकर्णधार स्मृती मंधाना आणि पलाश मुच्छल यांचा लग्नसोहळा जोरात रंगत पकडत आहे. २३ नोव्हेंबर रोजी सांगलीत होणाऱ्या या लग्नाच्या तयारीसाठी दिग्गज क्रिकेटपटूंचा मेळा जमला आहे. वनडे वर्ल्डकप नुकताच जिंकल्यामुळे सोहळ्याची आनंदमय वातावरण अधिक उंचावले आहे.

लग्नापूर्वीच्या हळदीच्या कार्यक्रमात भारतीय महिला संघाच्या स्टार खेळाडूंनी रंगत आणली. २१ नोव्हेंबरला शुक्रवारी पार पडलेल्या या कार्यक्रमात जेमिमा रॉड्रिग्स, रेणुका सिंह, अरुंधती रेड्डी, शफाली वर्मा, राधा यादव यांच्यासह इतर क्रिकेटपटूंनी पिवळ्या पोशाखात नृत्य करून हळदी सोहळा खास बनवला. नवऱ्या पलाश मुच्छलसह स्मृतीनेही नृत्य केले, ज्यामुळे हा कार्यक्रम अधिक संस्मरणीय ठरला.
सांगली हे स्मृतीचे माहेर (cricket)असून, येथेच संपूर्ण लग्नसोहळा पार पडणार आहे. हळदीपासून लग्नपर्यंतच्या प्रत्येक क्षणाचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर चाहत्यांसोबत शेअर केले जात आहेत. चाहत्यांनी या क्षणांना भरभरून लाईक्स आणि कमेंट्स दिल्या आहेत.
स्मृती आणि पलाश गेल्या काही महिन्यांपासून एकमेकांना डेट करत होते. २ नोव्हेंबरला वनडे वर्ल्डकप जिंकल्याचा आनंद साजरा करत डीवाय पाटील स्टेडियममध्ये पलाशने स्मृतीच्या बोटात अंगठी घालून लग्नाची मागणी केली, आणि स्मृतीने होकार दिला.संपूर्ण क्रिकेट जगत आणि चाहते आता २३ नोव्हेंबरच्या लग्नाच्या मोठ्या सोहळ्याची उत्सुकतेने वाट पाहत आहेत.

हेही वाचा :
11 वर्षाच्या मुलावर बिबट्याचा हल्ला…
Snapchat चे नवे फीचर, ट्रेंडिंग टॉपिकवर पब्लिक चॅट करा, जाणून घ्या
हिवाळ्यात ही लक्षणे दिसली तर सावध व्हा! येऊ शकतो हार्ट अटॅक