पालघर, विक्रमगड तालुका: उतावळी आदर्श विद्यालयातील 11 वर्षीय मयंक विष्णू कुवरा या विद्यार्थ्यावर अचानक बिबट्याने हल्ला केला(Leopard). मयंक रोज जंगलातील पायवाटेने शाळेत जातो. घरापासून शाळेपर्यंतचा प्रवास 4 किलोमीटर असून, तो रोज एकूण 8 किलोमीटर पायी चालतो.

घटनेवेळी मयंक शाळा सुटल्यावर पडवीपाडा येथील घरी परतत होता. अचानक झाडीत दडलेल्या बिबट्याने मागून हल्ला केला. पण मयंकच्या पाठीत शाळेचे दप्तर असल्यामुळे बिबट्याचे (Leopard)पुढचे पाय दप्तरावर पडले आणि त्याचा पाठ वाचला. मात्र, बिबट्याच्या पंजामुळे मयंकच्या हातावर खोल जखमा झाल्या. त्याच्या हातावर अनेक टाके घालावे लागले; अणुकुचीदार नखांमुळे हात सोलपटून निघाले.

हल्ल्यामुळे घाबरलेला मयंक धाडसीपणे उभा राहिला आणि जोरात ओरडू लागला. इतर सहकारी विद्यार्थ्यांनी दगडफेक केली, ज्यामुळे बिबट्याला घाबरून जंगलाकडे धूम ठोकावी लागली. मुलांच्या आरडाओरड ऐकून जवळच्या लोकांनी धाव घेतली. मयंकला तातडीने विक्रमगड येथील ग्रामीण रुग्णालयात भरती करण्यात आले, जिथे त्याच्या हातावर टाके घालण्यात आले. डॉक्टरांनी त्याची प्रकृती स्थिर असल्याचे सांगितले.

पालघरमधील या भागात गेल्या काही दिवसांपासून बिबट्याचे दर्शन होत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. घटनेनंतर सोशल मीडियावर सर्वांना सतर्क केले गेले असून, शाळेत जाणाऱ्या मुलांसोबत काही नागरिक पाठवण्याची तयारी सुरु आहे. वनविभागाने या बिबट्यासाठी पिंजरा लावण्याची मागणी केली आहे.

हेही वाचा :

Snapchat चे नवे फीचर, ट्रेंडिंग टॉपिकवर पब्लिक चॅट करा, जाणून घ्या
हिवाळ्यात ही लक्षणे दिसली तर सावध व्हा! येऊ शकतो हार्ट अटॅक
सामना सुरु असतानाच 5.7 तीव्रतेचा भूकंप; भर मैदानात जाणवले धक्के