अंबरनाथमध्ये शुक्रवारी संध्याकाळी एक अत्यंत भीषण अपघात झाला असून या घटनेने राज्यभरात खळबळ उडाली आहे. शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार असलेल्या किरण चौबे यांच्या कारने वेगात अनेक वाहनं व पादचाऱ्यांना जोरदार धडक दिली. या अपघातात (accident)चार जणांचा जागीच मृत्यू झाला असून अनेकजण जखमी झाले आहेत. अचानक ड्रायव्हरला आलेला हार्टअटॅक हा या अपघाताचा मुख्य कारण असल्याची माहिती समोर येत आहे.हा अपघात अंबरनाथ पूर्व आणि पश्चिम भागाला जोडणाऱ्या पुलावर झाला. निवडणुका जवळ आल्याने उमेदवार प्रचारासाठी फिरत आहेत. त्याचदरम्यान बुवापाडा परिसरात सभेला जात असताना हा अपघात घडला. अपघातातील कार ही किरण चौबे यांच्या नावावर असून घटनेच्या वेळी ते देखील वाहनात उपस्थित होते.

ड्रायव्हर लक्ष्मण शिंदे यांना अचानक हार्टअटॅक आल्याने त्यांच्या हातातून वाहनाचे नियंत्रण सुटले. नियंत्रण सुटलेल्या गाडीने अनेक दुचाकींना व पादचाऱ्यांना चिरडलं. या भीषण धडकेमध्ये गाडीचा वेग इतका होता की, दुचाकीस्वार काही अंतरावर फेकले गेले. या घटनेत ड्रायव्हर (accident)लक्ष्मण शिंदे, दोन महानगरपालिका कर्मचारी आणि एका पादचारी नागरिकाचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे.या संपूर्ण घटनेचे CCTV फुटेज समोर आले असून त्यात अपघाताचा थरार स्पष्टपणे दिसत आहे. अपघातानंतर काही क्षण परिसरात भीतीचे वातावरण पसरले. स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना तात्काळ मदत केली.

या अपघातात किरण चौबे यांना देखील गंभीर मार लागला असून त्यांना तातडीने कल्याण येथील फोर्टिस हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती त्यांच्या कार्यकर्त्यांनी दिली. हॉस्पिटलच्या बाहेर मोठ्या प्रमाणात शिवसेना शिंदे गटाचे कार्यकर्ते जमले आहेत.दरम्यान, अंबरनाथ पोलिसांनी रात्री उशिरापर्यंत पंचनामा करून कार पोलीस ठाण्यात हलवली. अपघाताच्या वेळी संध्याकाळी साडेसहा ते सात वाजण्याच्या दरम्यान पुलावर मोठी वाहतूक लागली होती. पोलिसांनी तपासासाठी अनेक लोकांचे जबाब नोंदवले आहेत. प्राथमिक माहितीवरून अपघात अनियंत्रित वेग आणि अचानक झालेल्या हार्टअटॅकमुळे झाला असल्याचे निष्पन्न झाले आहे.

हेही वाचा :

स्मृती मंधानाच्या हळदीला….! टीम इंडियाच्या सहकाऱ्यांची धमाल मस्ती, पाहा Video
11 वर्षाच्या मुलावर बिबट्याचा हल्ला…
Snapchat चे नवे फीचर, ट्रेंडिंग टॉपिकवर पब्लिक चॅट करा, जाणून घ्या