मालेगाव तालुक्यातील डोंगराळे गावात तीन वर्षांच्या चिमुकलीवर अत्याचार करून तिची हत्या(murder) केल्याच्या घटनेमुळे संपूर्ण परिसरात संतापाची लाट उडाली आहे. या भयानक घटनेच्या निषेधार्थ आज मालेगावमध्ये बंदची हाक देण्यात आली असून नागरिकांनी रस्त्यावर उतरून आरोपीला फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली. चिमुकलीच्या न्यायासाठी आयोजित मोर्चामध्ये हजारो नागरिक सहभागी झाले आणि हातात निषेध फलक घेऊन जोरदार घोषणाबाजी केली.

घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी आरोपी विजय संजय खैरनार याला ताब्यात घेतलं. 16 नोव्हेंबरला पीडित मुलगी घराच्या अंगणात खेलत असताना आरोपीने तिला चॉकलेटचे आमिष दाखवून टॉवरजवळ नेलं आणि त्यानंतर अत्याचार करून तिची हत्या (murder)केली. मुलगी बेपत्ता झाल्यानंतर कुटुंबीय आणि गावकऱ्यांनी शोध मोहीम राबवली, ज्यामध्ये आरोपीसुद्धा सहभागी होता. पोलिसांनी घटनास्थळाची चौकशी करून आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
आज न्यायालयात आरोपीला हजर करण्याचा कार्यक्रम असताना प्रचंड जनक्षोभ आणि संतापामुळे वातावरण तापले. अनेक नागरिकांनी कोर्टात प्रवेश करण्याचा प्रयत्न केला, त्यांना समजावण्याचा पोलिसांचा प्रयत्न निष्फळ ठरला आणि शेवटी पोलिसांनी सौम्य लाठीचार्ज करून आंदोलकांना कोर्टाच्या आवाराबाहेर हाकलले.
मालेगावकर आणि डोंगराळे गावातील नागरिकांनी आज निषेध मोर्चा आणि कॅण्डल मार्च काढून निष्पाप मुलीच्या स्मृतीस श्रद्धांजली वाहिली आणि आरोपीला त्वरित फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली. घटनेमुळे संपूर्ण मालेगावमध्ये दु:ख आणि संतापाचे वातावरण पसरले असून नागरिक हे प्रकरण निष्पक्षपणे आणि जलद न्यायालयीन प्रक्रियेत हाताळावे अशी मागणी करत आहेत.

हेही वाचा :
तलवारीने सपासप वार… काँग्रेस नेत्याचा जागीच मृत्यू… 2 जण गंभीर जखमी…
गरम पाण्यात मिठ टाकून पाय बुडवून बसल्यास कोणते आजार बरे होतात?
प्रसिद्ध अभिनेत्रीने थेट आलिया भट्टच्या काकाचा कॉल रेकॉर्डिंग केला लीक