भारतीय क्रिकेटपटू हार्दिक पंड्या पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आला आहे. खेळापेक्षा त्याचे खासगी आयुष्य सध्या अधिक चर्चेत आहे. नताशा स्टँकोविचपासून झालेल्या घटस्फोटानंतर हार्दिक पंड्या आता मॉडेल माहिका शर्मा(pregnant) हिला डेट करत असल्याच्या चर्चेला जोर आला आहे.दोघे अनेकदा एकत्र दिसल्याचे व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर समोर आले आहेत. इतकेच नव्हे, हार्दिकने अलीकडेच माहिकासोबत खास पद्धतीने वाढदिवस साजरा केल्याचा व्हिडिओ देखील व्हायरल झाला. त्यानंतर दोघांनी गुपचूप साखरपुडा केला असल्याची चर्चा रंगली आहे.

काही फोटोंमध्ये हार्दिकने माहिकाला कडेवर उचललेलेही दिसून आले आहे, ज्यामुळे चाहत्यांमध्ये उत्सुकता आणि चर्चा आणखी वाढली.
प्रेग्नन्सीच्या चर्चांना उधाण
हार्दिक आणि नताशाच्या आयुष्यातही अशाच अफवांनंतर अचानक लग्न झाले होते. आता सोशल मीडियावर अशीच चर्चा सुरू आहे की, माहिका शर्मा प्रेग्नंट आहे आणि हार्दिक पुन्हा वडील होणार आहे.
या चर्चांनी जोर पकडताच माहिकाने स्वतः सोशल मीडियावर प्रतिक्रिया दिली.
माहिकाचा व्हायरल खुलासा
माहिकाने मजेशीर अंदाजात या अफवांवर उत्तर दिलं. तिने पोस्टमध्ये लिहिलं:
“इंटरनेटवर पाहतेय की माझा साखरपुडा झाला आहे. पण मी दररोज चांगले दागिने घालते… त्यामुळे लोक गोंधळतात.”
तिने मुलांच्या गुलाबी खेळण्याच्या स्ट्रोलरचा फोटो शेअर करत लिहिले:
“प्रेग्नन्सीच्या(pregnant) अफवांना उत्तर देण्यासाठी मी ही स्टॉलर चालवू शकते का?”
ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे आणि चाहत्यांचे तसेच ट्रोलर्सचे कमेंट्सचे तुफान सुरू आहे.
हार्दिकची शांतता कायम
या चर्चांवर हार्दिक पंड्या मात्र अद्याप पूर्ण शांत आहे. नताशासोबत वेगळे झाल्यानंतर आता तो माहिकासोबत आहे का? लग्न किंवा साखरपुडा झाला आहे का? यावर अधिकृत घोषणा अद्याप झालेली नाही.

हेही वाचा :
गल्ली बोळातले “चेहरे” आता चौका चौकात दिसू लागले!
“सर्वकाही उडवून देऊ”, ‘या’ अभिनेत्याला पाकिस्तानातून धमकी
तब्बल 4 हजार रुपयांनी कोसळली चांदी, सोन्याचे भावही थंडावले