बॉलिवूड आणि अंडरवर्ल्डचा संबंध हा नवा विषय नाही. गेल्या अनेक दशकांपासून अनेक कलाकारांना धमक्या, दडपशाही आणि सुरक्षेची गरज भासली आहे. सलमान खानवर झालेल्या धमक्यांनंतर आता आणखी एका स्टारचे नाव चर्चेत आलं आहे. यावेळी अभिनेता विवेक ओबेरॉयला पाकिस्तानातून(Pakistan) जीवे मारण्याची धमकी मिळाल्याची माहिती समोर आली आहे.एक काळ होता जेव्हा विवेक आणि ऐश्वर्या राय यांच्या नात्यामुळे तो चर्चेत होता. पण आता तो एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेच्या केंद्रस्थानी आहे. एका मुलाखतीत विवेक ओबेरॉयने या धक्कादायक घटनेचा खुलासा केला.

विवेक ओबेरॉयच्या म्हणण्यानुसार, 2009 मध्ये ‘कुर्बान’ सिनेमाच्या शूटिंगदरम्यान अमेरिकेत असताना त्याला पहिली धमकी मिळाली.“मी अमेरिकेत शूटिंग करत होतो आणि मला एक फोन आला. मी कॉल उचलला नाही, पण आंसरिंग मशीनवर मेसेज सोडण्यात आला. त्यात स्पष्ट शब्द होते — ‘We will end everything… we will blow everything.’”सुरुवातीला विवेकने याकडे दुर्लक्ष केले. पण स्थानिक प्रॉडक्शन टीमच्या आग्रहानंतर त्याने तक्रार नोंदवली आणि एका वकिलाची मदत घ्यावी लागली.

स्थानिक पोलिसांनी नंबर ट्रेस केल्यानंतर धक्कादायक माहिती मिळाली. फोन पाकिस्तानातून(Pakistan) करण्यात आला होता. त्या क्षणानंतर विवेक ओबेरॉयने सुरक्षा वाढवली.“त्या क्षणापासून मला आणि माझ्या कुटुंबाच्या सुरक्षेची खरी भीती वाटू लागली,” असे विवेक म्हणाला. त्यानंतर मुंबईत परतल्यावरही त्याला धमक्यांचे कॉल येत राहिले, त्यामुळे त्याला पोलीस संरक्षण घेण्याची वेळ आली.

हेही वाचा :
तुम्ही जर नारळ पाणी प्याल तर पडेल महागात! पण कधी? जाणून घ्या
शिंदे गटातील उमेदवाराच्या कारचा भीषण अपघात; ‘इतक्या’ जणांचा मृत्यू
स्मृती मंधानाच्या हळदीला….! टीम इंडियाच्या सहकाऱ्यांची धमाल मस्ती, पाहा Video