टी-20 वर्ल्ड कप 2026 संदर्भात एक मोठी अपडेट समोर आली आहे. आयसीसीने या स्पर्धेसाठी 20 संघांची विभागणी चार गटांमध्ये केली असून यामध्ये भारत आणि(World Cup) पाकिस्तान एकाच गटात आहेत. त्यामुळे क्रिकेट चाहत्यांची उत्कंठा आता अधिक वाढली आहे. यंदाच्या टी-20 विश्वचषकाचे आयोजन भारत आणि श्रीलंका संयुक्तपणे करणार असून स्पर्धा 7 फेब्रुवारी ते 8 मार्च 2026 दरम्यान रंगणार आहे.भारताच्या गटात पाकिस्तान, अमेरिका, नामिबिया आणि नेदरलँड्सचा समावेश आहे. त्यामुळे भारतासाठी हा गट तुलनेने सोपा मानला जात असला, तरी भारत-पाक सामना हा सर्वात चर्चेचा विषय ठरणार आहे. स्पर्धेतील भारत-पाकिस्तानचा सामना 15 फेब्रुवारीला कोलंबो येथे खेळला जाण्याची शक्यता आहे.

भारताचा पहिला सामना 8 फेब्रुवारी रोजी अहमदाबाद येथे अमेरिकेविरुद्ध होऊ शकतो. तर दुसरा सामना 12 फेब्रुवारी रोजी दिल्लीमध्ये नामिबियाविरुद्ध आयोजित केला जाऊ(World Cup) शकतो. 18 फेब्रुवारी रोजी मुंबईत भारताचा नेदरलँड्ससोबत सामना होण्याची शक्यता आहे.या स्पर्धेतील सामने भारतातील अहमदाबाद, दिल्ली, कोलकाता, मुंबई आणि चेन्नई येथे खेळवले जातील. श्रीलंकेत कोलंबो आणि कँडी या शहरांना सामन्यांची संधी मिळणार आहे. अंतिम सामना नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये आयोजित केला जाऊ शकतो, मात्र पाकिस्तान किंवा श्रीलंका उपांत्य फेरी गाठल्यास कोलंबोला आयोजनाची संधी मिळेल.

यंदाचा विश्वचषक पूर्णपणे नवीन फॉरमॅटमध्ये खेळला जाणार असून प्रत्येक गटातील पाच संघ आपआपसात सामने खेळतील.

चारही ग्रुप्स :

ग्रुप 1: भारत, पाकिस्तान, अमेरिका, नामिबिया, नेदरलँड्स

ग्रुप 2: ऑस्ट्रेलिया, श्रीलंका, झिम्बाब्वे, आयर्लंड, ओमान

ग्रुप 3: इंग्लंड, वेस्ट इंडिज, इटली, बांगलादेश, नेपाळ

ग्रुप 4: दक्षिण आफ्रिका, न्यूझीलंड, अफगाणिस्तान, युएई, कॅनडा

भारतातील चाहत्यांसाठी हा टी-20 वर्ल्ड कप खास असणार आहे. विशेषत: भारत-पाकिस्तान सामन्याची वाट जगभरातील चाहते आतुरतेने पाहत आहेत.

हेही वाचा :

इचलकरंजीत अल्पवयीन मुलीशी अश्लील वर्तन प्रकरण गाजतंय; शहापूर पोलिस ठाण्यावर मोर्चा, आरोपीवर गंभीर गुन्हे दाखल
अजित पवारांच्या ताफ्यातील वाहनाचा अपघात, 4 जण गंभीर जखमी
कारच्या छतावर डान्स करण्याचा तरुणांचा स्टंट; चालकाने ब्रेक मारताच हवेत उडाले अन्…, VIDEO VIRAL