बीड जिल्ह्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या ताफ्यातील वाहनाला भीषण अपघात झाल्याची घटना समोर आली आहे. तेलगाव–धारूर मार्गावरील धुनकवड फाट्याजवळ हा अपघात(accident) झाला असून यात एका दुचाकीला धडक बसल्याने चार जण गंभीर जखमी झाले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, अजित पवारांचा ताफा तेलगावहून केजकडे जात असताना MH 02 GH 5732 या वाहनाने समोरून येणाऱ्या दुचाकीला जोरदार धडक दिली.

या अपघातात दुचाकीस्वार विष्णू दामोदर सुदे, त्यांची पत्नी कुसुम सुदे आणि त्यांच्या दोन लहान मुली गंभीर जखमी झाल्या असून सर्वांवर अंबाजोगाई येथील सरकारी रुग्णालयात(accident) उपचार सुरू आहेत. धडक इतकी जोरदार होती की दुचाकीचा अक्षरशः चुराडा झाला असून ताफ्यातील वाहनही पलटी होऊन मोठे नुकसान झाल्याची माहिती मिळाली आहे.
या दुर्घटनेत अजित पवारांच्या सुरक्षा पथकातील एक जवानही जखमी झाला असून त्याच्यावर देखील उपचार सुरू आहेत. प्राथमिक तपासात चालकाच्या निष्काळजीपणामुळे दुर्घटना घडल्याची माहिती समोर आली असून पोलिसांनी वाहनचालकाविरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.
अपघातानंतर काही काळ रस्त्यावर वाहतूक कोंडी झाली होती. पोलिसांनी घटनास्थळी दाखल होऊन वाहतूक सुरळीत केली. या घटनेमुळे परिसरात चिंता आणि संतापाचे वातावरण असून स्थानिक नागरिकांनी जखमी कुटुंबाला न्याय मिळावा आणि संबंधितांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी केली आहे.

हेही वाचा :
कारच्या छतावर डान्स करण्याचा तरुणांचा स्टंट; चालकाने ब्रेक मारताच हवेत उडाले अन्…, VIDEO VIRAL
कोल्हापुरात‘घाटगे–मुश्रीफ विरुद्ध मंडलिक’सामना; कागलच राजकारण तापणार
ट्रकच्या धडकेत ‘या’ प्रसिद्ध गायकाचा मृत्यू…