संगीतविश्वाला चटका लावणारी धक्कादायक बातमी समोर आली आहे. पंजाबी संगीत इंडस्ट्रीतील लोकप्रिय गायक हरमन सिद्धू यांचे वयाच्या 37 व्या वर्षी भीषण रस्ते अपघातात(accident) निधन झाले आहे. त्यांच्या अचानक जाण्याने चाहत्यांसह संगीत क्षेत्रात शोककळा पसरली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, हरमन सिद्धू हे शुक्रवारी मध्यरात्री शूटिंगवरून आपल्या मूळ गाव ख्लालाला परतत होते. यावेळी त्यांच्या कारला ट्रकची जोरदार धडक बसली आणि हा अपघात(accident) इतका गंभीर होता की घटनास्थळीच त्यांचा मृत्यू झाला. पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी पोहोचून पुढील प्रक्रिया सुरू केली.

हरमन सिद्धू यांनी पंजाबची प्रसिद्ध गायिका मिस पूजा यांच्या सोबत अनेक लोकप्रिय अल्बम्स केले होते. त्यांचे “पेपर या प्यार” हे गाणं तर सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले होते आणि त्यांना रातोरात लोकप्रियता मिळवून दिली होती.

त्यांची इतर लोकप्रिय गाणी:

लव्ह मॅरेज
थकेवन जट्टन दा
पई गया प्यार
खुलियां खिडकियां

विशेष म्हणजे हरमन सिद्धू यांची दोन नवी गाणी लवकरच रिलीज होणार होती. या गाण्यांचे शूटिंग पूर्ण झाले होते. मात्र त्यांच्या अचानक जाण्याने चाहत्यांसाठी ही मोठी धक्कादायक बातमी ठरली आहे.

हेही वाचा :

कोल्हापूर येथील कागलमध्ये महायुतीत गोंधळ, निष्ठावंत कार्यकर्त्यांकडून स्पष्ट नाराजी
इतना डरना जरुरी है…!
..तर माझा मृत्यू होईल,’ अक्षय कुमारचं नाव घेत शेफाली शाहने सांगितला ‘तो’ भयानक अनुभव