कोल्हापूर/विशेष प्रतिनिधी:
नवी दिल्लीतील लाल किल्ला परिसरात सोमवार दिनांक 10 नोव्हेंबर रोजी च्या सायंकाळी कार मध्ये झालेल्या शक्तिशाली स्फोटानंतर भारतीय गुप्तचर यंत्रणांनी तसेच एन आय ए च्या अधिकाऱ्यांनी या प्रकरणाची पाळेमुळे खोदून काढली आहेत. त्यामुळे दहशतवाद्यांचे “अभयारण्य” असलेल्या पाकिस्तान मधील सत्ताधाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे. तिथले संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनी भारत पाकिस्तान वर केव्हाही हल्ला करू शकतो (necessary)अशी भीती जाहीरपणे बोलून दाखवली आहे. त्यासाठी”ऑपरेशन सिंदूर”संपलेले नाही या भारतीय लष्करी अधिकाऱ्यांच्या वक्तव्याकडे ते अंगुली निर्देश करत आहेत.फरीदाबाद येथील अल फलाह विद्यापीठाच्या कॅम्पसमध्ये काही डॉक्टर्सनीभारतावर हमास पद्धतीचाहल्ला करण्याचे कटकारस्थान रचले होते.

त्यांचा हा कट भारतीय तपास यंत्रणांनी उधळून लावला आहे. अटक करण्यात आलेल्या डॉक्टर मंडळींच्या जबाबदातून भारतीय तपास यंत्रणांना धक्कादायक खुलासे ऐकायला मिळत आहेत.गाझापट्टीतील हमास या दहशतवादी संघटनेने ज्या पद्धतीने इजराइलवर ड्रोन हल्ले केले त्याच पद्धतीनेभारतातील काही ठिकाणी ड्रोन हल्ले तसेच रॉकेट लॉन्चर चा वापर करण्याचे या देशद्रोही डॉक्टर्सनी ठरवले होते आणि तसे नियोजनही केले होते.नवी दिल्लीत झालेल्याकारमधील शक्तिशाली पोटाची जबाबदारी घेण्यासाठी कोणतीही दहशतवादी संघटना पुढे आलेली नाही. कारण तशा सूचना तेथील सत्ताधाऱ्यांनीत्यांच्या अंकित असलेल्या दहशतवादी संघटनांच्या प्रमुखांना दिलेल्या होत्या.तथापि नवी दिल्लीत झालेला हल्ला हा मसूद अजहर याच्या”जैश”संघटनेच्या भारतातीलस्लीपर सेलच्या आणि हँडलरच्या माध्यमातून झाला असल्याचे पुराव्यासह सिद्ध झालेले आहे.
जैश चा संस्थापक मसूद अझर हा पाकिस्तान मध्ये आहे हे यापूर्वीच स्पष्ट झालेले आहे. सध्या त्याचे वास्तव्य बांगलादेशमध्ये असल्याचे सांगण्यात येते. नवी दिल्लीतील बॉम्बस्फोटामागे मसूर अझर याचा हात असल्याचे पुराव्या सह सिद्ध झाल्यानंतर पाकिस्तान मधील सरकारची भीती वाढली आहे(necessary). कारण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यास्फोटामागील शक्तींना सोडणार नाही. असा सज्जडदम दिला असल्यामुळे आणि ऑपरेशन सिंदूर अद्यापही संपलेले नाही असे वारंवार घोषित करण्यात आल्यामुळेपाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ हे चांगलेच गांगरले आहेत. नवी दिल्लीतील स्फोटाचे कारण पुढे करून भारत हा पाकिस्तान मधील दहशतवाद्यांच्या तळावर पुन्हा सर्जिकल स्ट्राइक करेल असे आसिफ यांनी जाहीरपणे बोलून दाखवले आहे.पाकिस्तान मध्ये सध्या अफगाणिस्तान मधील तालिबानी सरकारची चर्चा सुरू आहे.
कारण तालिबानी सरकारने पाकिस्तानने केलेले हल्ल्याला तितक्याच जोरदारपणे प्रत्युत्तर दिलेले आहे. याशिवाय पख्तून, पी ओ के आणि बलुचिस्तान मधील जनता रस्त्यावर उतरलेली आहे. अंतर्गत कलह वाढलेले आहेत. त्यात मसूद अजरने नवी दिल्लीत स्फोट घडवून आणलेला आहे. अशा अनेक संकटांनी ग्रस्त झालेला पाकिस्तान सध्या भारतापासून घाबरलेलाआहे.बॉम्बस्फोटाची दखल पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच गृहमंत्री अमित शहा, यांनी अतिशय गांभीर्याने घेतलेली आहे. बैठका सुरू आहेत.अजित डोवाल आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीसाठी वाढलेल्या आहेत.आणि स्पोर्ट घडवून आणणाऱ्या दहशतवाद्यांना आणि त्यांच्या म्होरक्यांनासोडणार नाही असा इशारा दिल्यानंतर भारताकडून कोणत्याही क्षणी सर्जिकल स्ट्राइक होऊ शकतो किंवा होईल म्हणून संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनी तसेच जाहीरपणे भीती बोलून दाखवली आहे. वास्तविक अशा प्रकारची भीती पाकिस्तानच्या सरकारला सदैव आणि सतत वाटत राहिली पाहिजे. तरच त्यांच्याकडून अशा प्रकारच्या कारवाया थांबू शकतील.

हेही वाचा :
अपचनाची समस्या आहे? मग दररोजच्या जीवनशैलीमध्ये करा फक्त हा बदल…
खास AI मशीनने काही सेकंदात हेअर कट? VIDEO खरा की खोटा?
सोनाक्षी सिन्हा हिचे प्रेग्नंसीबद्दल अत्यंत मोठे विधान, थेट म्हणाली, हा मी प्रेग्नंट..